ETV Bharat / state

राज्याचं लक्ष लागलेल्या माढ्यातून मोहिते-पाटील पुता-पुत्रांपैकी एकाला संधी? - fight

अनेक राजकीय घडामोडीनंतर आता मोहिते-पाटलांचे नाव पुढे आल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाल आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांसाठी प्रतिष्ठेची लढाई असणार आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील
author img

By

Published : Mar 27, 2019, 11:45 AM IST

सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारीचा सस्पेंस आज संपण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयसिंह मोहिते-पाटील आणि रणजितसिंह मोहिते-पाटील या पिता-पुत्रांना कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगितल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाजपने मोहिते-पाटलांना मैदानात उतरविले तर माढ्यात बिग फाईट पाहायला मिळणार आहे.

माढ्यात बिग फाईट पाहायला मिळणार

राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या मोहिते-पाटलांचे कट्टर विरोधक म्हणून माढ्याचे संजय शिंदे यांना ओळखले जाते. विरोधासाठी विरोधाचं राजकारण म्हणून भाजप पुरस्कृत जिल्हा परिषद अध्यक्ष असताना ते राष्ट्रवादीत गेले होते. त्यानंतर शिंदे यांची माढा लोकसभेसाठी राष्ट्रवादीने उमेदवारीही दिली. त्यामुळे त्यांच्या विरोधात कुणाला उतरवायचे याची चर्चा भाजपात सुरु होती.

Intro:सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारीचा सस्पेंस आज संपण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयसिंह मोहिते-पाटील आणि रणजितसिंह मोहिते-पाटील या पितापुत्रांनां कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगितल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय.
त्यामुळं भाजपनं मोहिते पाटलांना मैदानात उतरविलं तर माढ्यात बिग फाईट पाहायला मिळणार आहे.

Body:राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक माढ्याचे संजय शिंदे विरोधासाठी विरोधाचं राजकारण म्हणून भाजप पुरस्कृत जिल्हा परिषद अध्यक्ष असताना राष्ट्रवादीत गेले होते.त्यानंतर शिंदे यांची माढा लोकसभेसाठी राष्ट्रवादीनं उमेदवारीही दिलीय.त्यामुळं त्यांच्या विरोधात कुणाला उतरवायचे याची चर्चा भाजप सुरु होती.दरम्यान अनेक राजकीय
घडामोडीनंतर आता मोहिते -पाटलांचं नांव पुढं आल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालंय.

Conclusion:दोन्ही पक्षांतील नेत्यांसाठी प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. दोन पारंपरिक कट्टर विरोधक समोरा समोर येत असल्याने जिल्ह्याची उत्सुकता ताणली गेलीय...

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.