ETV Bharat / state

अकलूज येथे मोहिते-पाटील कुटुंबातच संघर्ष, चुरशीने मतदान सुरू

अकलूजचे विद्यमान सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक तसेच सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे चेअरमन विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

अकलूज येथे मोहिते-पाटील कुटुंबातच संघर्ष

author img

By

Published : Jan 15, 2021, 10:43 PM IST

पंढरपूर - सोलापूर जिल्ह्यातील अकलूज ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान चालू आहे. त्यात आता धैर्यशील मोहिते पाटील यांनी विरोधी पक्षावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप लावला आहे. अकलूज ग्रामपंचायत निवडणूकीत वेगळे वळण लागले आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या अकलूज ग्रामपंचायतीसाठी अत्यंत चुरशीने मतदानाला सुरुवात झाली. अकलूजचे विद्यमान सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक तसेच सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे चेअरमन विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अकलूज ग्रामपंचायत ही आशिया खंडातील सर्वत मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. 17 ग्रामपंचायत जगासाठी ही लढत होत आहे. तर त्यातील एक जागा बिनविरोध निवडून आल्यामुळे निवडणूकीचे वातावरण तापले आहे.

अकलूज येथे मोहिते-पाटील कुटुंबातच संघर्ष

विजयसिंह गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी विरोधी गटाकडून आचारसंहिता भंग होत आहे, तसेच निवडणूक निर्णय अधिकारी जाणून-बुजून विरोधी पक्षाला मदत करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत विजयसिंह मोहिते-पाटील गटाकडून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार देण्यात आली आहे तर आपल्या चुलत्याला आव्हान देणारे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी अकलूजचा सरपंच आमचाच होणार, असा दावा केला आहे.

हेही वाचा - धक्कादायक; मतदानाच्या दिवशी स्मशानात उमेदवाराच्या नावाने जादूटोणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.