ETV Bharat / state

सांगोल्याचे एक लिटरही पाणी कमी होऊ देणार नाही, आमदार शहाजी पाटलांचा शब्द - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नीरा-देवधर व गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे शिल्लक राहणारे पाणी नीरा उजवा कालवा आणि डाव्या कालव्याच्या माध्यमातून लाभ क्षेत्राला समान पद्धतीने देण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतला आहे. त्यामुळे सांगोल्यासह अनेक तालुक्यातील लाभक्षेत्राला नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती आहे.

आमदार शहाजी पाटील
आमदार शहाजी पाटील
author img

By

Published : Feb 20, 2020, 4:46 PM IST

सोलापूर - सांगोला तालुक्याच्या हक्काचे एक लिटरही पाणी कमी होऊ देणार नाही, असे मत सांगोल्याचे आमदार अॅड. शहाजी पाटील यांनी व्यक्त केले. नीरा-देवधर व गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे शिल्लक राहणारे पाणी नीरा उजवा कालवा आणि डाव्या कालव्याच्या माध्यमातून लाभ क्षेत्राला समान पद्धतीने देण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतला आहे. त्यावर आमदार पाटील बोलत होते.

बोलताना आमदार अॅड. शहाजी पाटील

कॅबिनेटच्या या निर्णयामुळे बारामतीचे वळवलेले पाणी पुन्हा बारामतीला मिळणार आहे. त्यामुळे नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला तालुक्याच्या लाभ क्षेत्राला नुकसान होणार आहे, अशी भीती काही शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहावयास मिळत आहे.

आमदार पाटील पुढे म्हणाले, काल जो मंत्रिमंडळाचा निर्णय झाला आहे. तो अधिकृतरित्या माझ्याकडे आलेला नाही. शासननिर्णय पाहिल्यानंतर त्यावर स्पष्ट भाष्य करू. कायद्यानुसार हक्काच्या पाण्यातील एक लिटरही पाणी सोडणार नाही. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री सांगोला तालुक्यावर अन्याय होऊ देणार नाहीत, असा विश्वास असल्याचे आमदार पाटील म्हणाले.

हेही वाचा - सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी १५ दिवसात ११० किमी जमिनीचे सीमांकन करा - अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.