ETV Bharat / state

राजकीय आरक्षण मिळवून देणारच, ओबीसी मेळाव्यात विजय वडेट्टीवारांचा निर्धार

मला मंत्री पदाची आशा नाही, समाजासाठी मी अनेक वर्षांपासून सरकार सोबत झगडत आहे. सत्तेला चिटकून बसलेल्यामध्ये अशी हिंमत होऊ शकत नाही. मात्र, मला सत्तेपेक्षा समाजहीत महत्वाचे आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे रद्द झालेले राजकीय आरक्षण मिळवून देणारच, असा निर्धार त्यांनी शहरातील आयोजित ओबीसींच्या निर्धार मेळाव्यात केला.

विजय वडेट्टीवारांचा निर्धार
विजय वडेट्टीवारांचा निर्धार
author img

By

Published : Sep 1, 2021, 6:29 AM IST

Updated : Sep 1, 2021, 6:54 AM IST

सोलापूर- सोलापुरात मंगळवारी ओबीसी समाजातील विविध जाती समूहांनी एकत्रित येत निर्धार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी व त्यांच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे मत आपल्या भाषणातून व्यक्त केले.

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना राखीव जागा उपलब्ध होणार नसल्याने खुल्या गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे. आता महानगरपालिका, आणि पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. त्या निवडणुकीपूर्वी आरक्षण मिळावी, अशी मागणी ओबीसी समाजातून करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ओबीसी समाजाकडून आंदोलने केली जात आहेत. त्याच प्रमाणे सोलापूरमध्ये देखील आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी व त्यांच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे मत वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.

ओबीसी मेळाव्यात विजय वडेट्टीवारांचा निर्धार

यावेळी भाजपाचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदर प्रणिती शिंदे, राजेश राठोड, माजी आमदार नरसय्या आडम, माजी खासदार हुसेन दलवाई, महापौर कांचना यन्नम, माजी महापौर नलिनी चंदेले, शरद कोळी, सादिक कुरेशी, बाबा मिस्त्री, हसीब नदाफ आदी उपस्थित होते.

सत्तेला चिटकून असलेल्याची सरकार सोबत झगडण्याची हिंमत होत नाही-

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, मी 25 वर्षांपासून आमदार आहे. मला मंत्री पदाची आशा नाही, समाजासाठी मी अनेक वर्षांपासून सरकार सोबत झगडत आहे. सत्तेला चिटकून बसलेल्यामध्ये अशी हिंमत होऊ शकत नाही. मात्र, मला सत्तेपेक्षा समाजहीत महत्वाचे आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे रद्द झालेले राजकीय आरक्षण मिळवून देणारच, असा निर्धार त्यांनी शहरातील आयोजित ओबीसींच्या निर्धार मेळाव्यात केला.

स्वतंत्र अधिवेशनाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करू-

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करणार आहो. आणि मुख्यमंत्री यांकडे स्वतंत्र अधिवेशन घेण्याची विनंती करू.त्या अधिवेशनात बिल मांडू आणि त्याला जो विरोध करेल,तो कायमचं मरेल, सत्तेत पून्हा येणार नाही असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला.

Last Updated : Sep 1, 2021, 6:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.