सोलापूर- राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज सोलापुरात प्रदूषण मुक्तीचा नारा दिला आहे. शहरातल्या प्रदूषण मुक्तीसाठी देशमुख यांनी स्वतः सायकल चालवत स्थानिक कार्यक्रमांना हजेरी लावायचा निर्णय घेतला होता.
शहराला प्रदूषन मुक्त करण्याच्या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी शहरवासीयांना सायकलने प्रवास करायचा सल्ला दिला. आणि स्वतः येणाऱ्या काळात जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे सायकलवर प्रवास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रोजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांना सायकल ने प्रवास करणे शक्य नाही, पण प्रत्येकांनी ठरवून आठवड्यातून एकदा सायकल प्रवास केला पाहिजे. असे केल्यास स्वतःचे स्वास्थ आणि पर्यावरणाचा समतोल दोन्ही साधणे शक्य होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
सायकल चालवत असताना मंत्री सुभाष देशमुख यांच्या मागे गाड्यांचा ताफा होता. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले, मागे गाड्यांचा ताफा जरी असला तरी तो मंत्री या नात्याने व्यवस्थेचा भाग आहे. माझ्या सहकाऱ्यांना देखील मी आठवड्यातून एक दिवस सायकल प्रवास करण्याचा सल्ला देत असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.