ETV Bharat / state

भाजप महाविकास आघाडीत भांडणे लावण्याचे काम करते - जयंत पाटील - चंद्रकांत पाटील बातमी

चंद्रकांत पाटील आणि भारतीय जनता पक्ष हे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना रोज रात्री सत्ता येण्याची स्वप्न पडतात, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

जयंत पाटील
जयंत पाटील
author img

By

Published : Mar 30, 2021, 6:39 PM IST

Updated : Mar 30, 2021, 7:24 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - चंद्रकांत पाटील आणि भारतीय जनता पक्ष हे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना रोज रात्री सत्ता येण्याची स्वप्न पडतात, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक लागली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते पंढरपुरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा आणि शरद पवार यांच्या कथित भेटीवर भाष्य करताना दिल्लीतील पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. अशा प्रकारचे वक्तव्य करून महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवीन बदल घडणार आहे, असे भासवत आहेत. मात्र, असे काही होणार नसून चंद्रकांत पाटील भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून अशी वक्तव्य करत असून चंद्रकांत पाटील हे महाविकास आघाडीत भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

कोरोनाची वाढती संख्या चिंताजनक

सध्या राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे राज्यसरकार समोर आव्हान आहे. मात्र, लोकांची सर्व कामे दैनंदिन सुरू राहिली पाहिजेत, मात्र गर्दी होता कामा नये. त्यामुळे सरकारकडून योग्य तोच निर्णय घेतला जाईल. सामान्य नागरिकाला फटका बसणार नाही. सध्या तरी टाळेबंदी संदर्भात राज्य सरकारचा विचार नाही, असे मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

बोलताना मंत्री जयंत पाटील

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील भगीरथ भालकेंचा विजय निश्चित

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे निवडणूक लढवत आहे. भगीरथ भारत भालके यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्षांचाही आम्हाला पाठिंबा आहे. योग्य ती काळजी घेत आमचे कार्यकर्ते घराघरात प्रचार करत आहे. सध्या पश्चिम बंगाल, आसाम आणि बिहारमधील निवडणुकांमध्ये विविध मंत्री आणि नेतेही सभा घेत होते. आम्हीही कोरोनाचे नियम पाळत सभा प्रचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले. या मतदार संघात भारत भलके यांनी केलेल्या कामाच्या जोरावर त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडली असल्यामुळे ते प्रचाराला येणार नाहीत, असही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

बोलताना मंत्री जयंत पाटील

हेही वाचा - पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपकडून समाधान आवताडे तर राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांचे अर्ज दाखल

Last Updated : Mar 30, 2021, 7:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.