सोलापूर – सोलापूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती मिळाली आहे. सोलापूर जिल्ह्याजवळ असलेल्या कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात भूकंपाचे केंद्रबिंदू आहे. उत्तर कर्नाटकमध्ये 4.9 रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच सोलापूर शहरातील रामवाडी,सलगरवस्ती,शेटे वस्ती,रेल्वे स्टेशन परिसरातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. भूकंपामुळे किती नुकसान झाले याची अद्याप माहिती मिळालेली नाही.
रामवावाडी आणि सलगर वस्ती परिसरात जाणवले भूकंपाचे धक्के - शनिवारी 9 जुलै रोजी सकाळच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याचं नागरिक सांगत आहेत. सुरुवातीला नेमकं काय सुरु आहे, नागरिक एकमेकांत चर्चा करत गोंधळून गेले होते. त्यानंतर भूकंप झाल्याची माहिती लोकांना मिळाली आहे. सोलापुरातील रामवाडी,सलगर वस्ती,शेटे वस्ती,रेल्वे स्टेशन परिसरात सौम्य धक्के जाणवले आहेत.
कर्नाटकातील विजापूर येथे भूकंपाचा केंद्रबिंदू- सोलापूरपासून जवळच्या अंतरावर असलेल्या कर्नाटक राज्यात विजयपूर येथे भूकंपाचे केंद्रबिंदू आहे. त्या ठिकाणी 4.9 रिस्टर स्केल भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. अद्याप कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. भूकंप झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून कुठे काय घडलं आहे का ? याची चौकशी केली जात आहे. काही ठिकाणी कमकुवत घरांच्या भिंतींना तडे गेल्याचे दिसून आले आहे.