पंढरपूर : करमाळा तालुक्यातील जिंती येथे मनोरुग्ण मुलाने वयोवृद्ध वडीलास बेदम मारहाण केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना 2 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वडिलांना बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण -
गुरुवारी रात्रीच्या सुमारास अंकुश जगताप हा दारू पिऊन घरी आला. त्यातच वडील राजाराम जगताप यांना बेशुद्ध पडेपर्यंत मारत राहिला. याची बातमी सकाळी गावातील नागरिकांना कळाली. नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्या सविता देवी राजे भोसले यांच्या कानावर घातली. त्यानंतर सविता देवी राजे भोसले यांनी तत्काळ राजाराम जगताप यांना करमाळा येथे उपचारासाठी पाठवले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
मनोरुग्ण अंकुशला दारूचे व्यसन -
करमाळा तालुक्याच्या जिंती गावात राजाराम मारुती जगताप (75) हे आपल्या एकूलत्या एका मुलासह राहतात. अंकुशला एक पत्नी व व दोन मुले असा परिवार आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून अंकुशच्या वेडेपणाला कंटाळून बायको सोडून गेली आहे. गेल्या काही दिवसापासून अंकुश जगताप हा डोक्यावर परिणाम झाल्यासारखा वागत होता. त्याला मनोरुग्णालयातदेखील दाखल करण्यात आले होते. मात्र, तो बरा होऊ शकला नाही. त्यानंतर दारू पिऊन गावातील रेल्वे गेट जवळ बसून चकरा मारत असे.
हेही वाचा - दिल्लीत आंदोलनाला बसलेले शेतकरी जास्त शहाणे आहेत का?, चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली