ETV Bharat / state

Maratha Reservation Movement : मराठा आंदोलन अजूनही जिवंत.. कधीही उद्रेक होऊ शकतो : नरेंद्र पाटील - मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालय

मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात योग्य आणि अभ्यासपूर्ण भूमिका मांडली ( Maratha Reservation State Govt In SC ) नाही. आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेत अडकले म्हणजे आंदोलन संपले असे नाही. मराठा आंदोलन अजूनही जिवंत असून, त्याचा कधीही उद्रेक होऊ शकतो, असा इशारा माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील ( Narendra Patil On Maratha Reservation Movement ) यांनी दिला आहे.

नरेंद्र पाटील
नरेंद्र पाटील
author img

By

Published : Mar 24, 2022, 5:53 PM IST

सोलापूर- मराठा समाजाच्या आरक्षणावर सुरू झालेले आंदोलन ( Maratha Reservation Movement ) अजूनही जिवंत आहे. त्याचा कधीही उद्रेक होऊ शकतो, असा इशारा माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी दिला. सोलापूर दौऱ्यावर असताना महाविकास आघाडी सरकारला त्यांनी एकप्रकारे इशाराच दिला ( Narendra Patil On Maratha Reservation Movement ) आहे. कै. अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त नरेंद्र पाटील सोलापुरात आले होते. सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चामधील मराठा बांधवानी 40 व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच कै अण्णासाहेब पाटील यांची रांगोळी माध्यमातून प्रतिमा साकारली होती. दौऱ्यावर असताना नरेंद्र पाटील यांनी सोलापूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपले मत व्यक्त केले आणि महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त ( Maratha Reservation State Govt In SC ) केली. यावेळी राम जाधव, किरण पवार आदी उपस्थित होते.

मराठा आंदोलन अजूनही जिवंत.. कधीही उद्रेक होऊ शकतो : नरेंद्र पाटील

आपल्यात आणि संभाजी राजे यांमध्ये कोणताही इगो नाही : नरेंद्र पाटील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, आपल्यात आणि संभाजीराजे यांच्यात कोणताही इगो नाही. मी त्यांच्या मुंबईत मधील आंदोलनातही सहभागी झालो होतो. संभाजीराजे मोठे आहेत. त्यांनी सर्वांना घेऊन आंदोलन कराव. "सोलापुरात मराठा क्रांती मोर्च्याच्या पुढाकाराने मोठे आंदोलन हाती घेतले होते. यावेळी संभाजीराजे यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या विरोधात काम केले. तसेच हे भाजप पूरस्कृत आंदोलन आहे असा देखील अपप्रचार केला. तरीही मराठा आंदोलन यशस्वी करून दाखवले. आमची किंवा संभाजीराजे यांची एकच भूमिका आहे, मराठा समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत.

मराठा आंदोलन अजूनही जिवंत आहे; उद्रेक कधीही होऊ शकतो : आर्थिक योजना तातडीने लागू करा. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्या. सुप्रीम कोर्टात अनेक मुद्द्यांवर विद्यमान सरकारच्या वतीने घेण्यात आलेली भूमिका आक्रमक आणि अभ्यासपूर्ण नव्हती. न्यायालयीन प्रक्रियेत हा मुद्दा अडल्यामुळे आंदोलन संपलं असे नाही. आमचे आंदोलन अजूनही जिवंत आहे. याचा कधीही उद्रेक होऊ शकतो. असे नरेंद्र पाटील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.

ईडीच्या कारवाया बाबत नरेंद्र पाटील यांनी समर्थन केले : राज्यात सध्या ईडीच्या धाडी पडत आहेत. याचं नरेंद्र पाटील यांनी समर्थन केले आहे. ते म्हणाले, काहीतरी चुका झाल्या आहेत म्हणून अधिकारी घरापर्यंत पोहोचले आहेत. कोरोना काळात सारे काही बंद असताना लोकांकडे पैसे नव्हते. तेव्हा ही मंडळी इमारती विकत घेत होती. कुठून आला याचा पैसा याचा हिशोब झाला पाहिजे. सरकारी यंत्रणा काम करत आहेत, आपण त्यामध्ये हस्तक्षेप कशाला करावा, असे मत नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.