ETV Bharat / state

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी, महाविकासआघाडी विरोधात भाजप लढत होण्याची शक्यता - Solapur news

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पोटनिवडणुकीसाठी पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील इच्छुक उमेदवार आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. इच्छुकांकडून विविध पक्षांकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीकडून तिकीटासाठी इच्छुकांची गर्दी मोठी आहे तर भाजप भाजपचा गोठ्यातून कोणाला उमेदवारी मिळते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. यामुळे मतदारसंघांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे.

विधानसभा
विधानसभा
author img

By

Published : Mar 17, 2021, 5:40 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पोटनिवडणुकीसाठी पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील इच्छुक उमेदवार आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. इच्छुकांकडून विविध पक्षांकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीकडून तिकीटासाठी इच्छुकांची गर्दी मोठी आहे तर भाजप भाजपचा गोठ्यातून कोणाला उमेदवारी मिळते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. यामुळे मतदारसंघांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादीकडून इच्छुकांची गर्दी, भगीरथ भालके यांचे नाव आघाडीवर

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघ रिक्त झाला आहे. त्यातच आमदार भारत भालके यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची या मतदारसंघातून भक्कम पकड होती. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, महा विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीकडे हा मतदार संघ आहे. तसेच राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे सुपुत्र व विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके व भारत भालके यांची पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी देण्याची मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी अनेक दिग्गजांनी बारामतीच्या वाऱ्या केल्या आहेत. मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत जोरदार चर्चा रंगली होती. यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार याबाबत शंका आहे.

पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या गटातून उमेदवारीबाबत उत्सुकता

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीमध्ये भाजप आपला उमेदवार रिंगणात उतरणार आहे. त्यासाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी होताना दिसत आहे. यामध्ये सध्या परिचारक कुटुंबातील उमेश परिचारक व प्रणव परिचारक यांचे नाव आघाडीवर आहे. हे तर प्रणव परिचारक यांनी निवडणूक लढण्याची इच्छा आहे व्यक्त केली आहे. तसेच मंगळवेढा येथील दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांच्या नावाचाही विचार भाजपकडून केला जात आहे. तसेच शिवसेनेचे नेत्या शैलेजा गोडसे याही भाजपकडून मिळणार असल्याची चर्चा आहे. तसेच धनगर समाजाकडूनही भाजपच्या उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे. मात्र, आमदार प्रशांत परिचारक यांची भूमिका भाजपाच्या उमेदवारीसाठी महत्त्वाचे राहणार आहे.

रासप व स्वाभिमानीची महाविकास किंवा भाजपकडून उमेदवारी देण्याची मागणी

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सभासद वाढवा अभियान सुरू करण्यात आले होते. तसेच पंढरपूर येथे घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये स्वाभिमानीकडून मतदारसंघावर हक्क सांगण्यात आल आहे. तर महा विकासाकडे या मतदारसंघाची मागणी स्वाभिमानीकडून करण्यात येणार आहे. तसेच रासपचे महादेव जानकर यांनी आपला उमेदवार मैदानात उतरवण्याची घोषणा केली आहे तर धनगर समाजाकडून होळकर वाडा येथे धनगर समाजबांधवांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये धनगर समाजाला या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मिळाले नाही. त्यामुळे धनगर समाजाकडून राष्ट्रवादी व भाजप यांचेकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे धनगर समाजाचे नेते सुभाष मस्के यांनी केली होती. तसेच 21 मार्चला वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे पंढरपूर दौऱ्यावर येत असून त्यावेळी वंचित आघाडीचा उमेदवार घोषित होण्याची दाट शक्यता आहे.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची शक्यता

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ हा महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादीकडे हा मतदार संघ आहे. तसेच मंगळवेढा येथे झालेल्या महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. तसेच भाजपकडून मतदार संघातील उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. तर रासप, स्वाभिमानी, वंचित यांच्या उमेदवारीची उत्सुकता जोरात आहे. मात्र, थेट लढत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असेच होणार आहे. यातूनच पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघ आला नवा लोकप्रतिनिधी मिळणार आहे.

हेही वाचा - माजी जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी साठे यांचे निधन

हेही वाचा - पंढरपूरसह देशातील 14 विधानसभा, 2 लोकसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक 17 एप्रिलला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.