ETV Bharat / state

मंगळवेढा येथील सरपंच, ग्रामसेवकाला लाच घेताना लाचलुचपत पथकाने पकडले रंगेहाथ - Pandharpur latest

सोलापुर येथील रामलाल चौकात ग्रामसेवक, सरपंच आणि अखिल शेख या तिघांना दहा हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिली आहे.

मंगळवेढा येथील सरपंच, ग्रामसेवकाला लाच घेताना लाचलुचपत पथकाने पकडले रंगेहाथ

author img

By

Published : May 23, 2021, 2:15 PM IST

पंढरपूर - महिला बचत गट प्रशिक्षणाचे मानधन मिळवून देण्यासाठी महिलेकडून १० हजारांची लाच घेतांना लाचलुचपत पथकाकडून सरपंचासह ग्रामसेवक व एका व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आले आहे. मंगळवेढा तालुक्यातील धर्मगाव येथील सरपंच आप्पासाहेब येसप्पा पाटील (वय ५७), ग्रामसेवक श्रीकांत मधुकर ठेंगील (वय ३८) व अरबाज अखिल शेख (वय २१) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिघांनी मिळून २५ हजारांची मागितली होती लाच

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार दिली होती. त्या व्यक्तीने दोन वर्षांपूर्वी धर्मगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १४ व्या वित्त आयोगाकडून गावातील बचतगटाच्या महिलांसाठी ३० दिवसांचे प्रशिक्षण दिले होते. यासाठी मानधन म्हणून त्यांना ९६ हजार रुपये मंजूर झाले होते. ते पैसे मंजूर करण्यासाठी तिघांनी मिळून २५ हजारांची लाच मागितली होती, मात्र दहा हजार रुपये देण्याचे ठरले होते. सोलापुर येथील रामलाल चौकात ग्रामसेवक, सरपंच आणि अखिल शेख या तिघांना दहा हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांच्यासह हवालदार सायबण्णा कोळी, शिरीषकुमार सोनवणे, अर्चना स्वामी, श्रीराम घुगे, कोष्टी, प्रफुल जानराव, स्वप्नील सन्नके, श्याम सुरवसे पथकातील आदी लोकांनी केली आहे.

हेही वाचा - 'लहान मुलांमधील कोरोना' या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बालरोग तज्ज्ञांसोबत संवाद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.