ETV Bharat / state

Solapur Crime : बार्शीतील फटाका फॅक्टरी स्फोटातील मुख्य आरोपीस अटक - फटाका कारखान्यात स्फोट

इंडियन फायरवर्क्स फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटात (Barshi firecracker factory blast) चार महिला कामगारांचा मृत्यू झाला होता. फटाका फॅक्टरीचे मालक युसूफ मणियार आणि नाना पाटेकर यांवर पांगरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल (Case registered against firecracker factory owner) झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी युसूफ मणियार याला ज्वारीच्या शेतातून अटक (Firecracker factory owner arrested) केली आहे. पांगरी पोलिसांनी ताबडतोब सर्व शेताला चोहोबाजूंनी घेरून युसूफला ताब्यात घेतले (Accused in police custody).

Solapur Crime
फॅक्टरी स्फोटातील मुख्य आरोपीस अटक
author img

By

Published : Jan 3, 2023, 10:45 PM IST

सोलापूर : युसूफला बार्शी येथील न्यायालयात उभे केले असता 7 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. घटना घडल्यापासून ग्रामीण पोलिसांनी दोघांच्या अटकेसाठी चार पथके पाठवली होती. एपीआय नागनाथ खुणे यांच्या पथकाला मंगळवारी दुपारी माहिती मिळाली होती. इंडियन फायर वर्क्स फॅक्टरीचा (Barshi firecracker factory blast) मालक युसूफ मणियार हा शिराळे गावातील एका ज्वारीच्या शेतात लपून बसला आहे. चार पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन युसूफ मणियार यास बेड्या ठोकल्या (Firecracker factory owner arrested) आहेत. मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याला बार्शी येथील न्यायालयात उभे केले असता 7 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. (Case registered against firecracker factory owner) या घटनेचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकुल करत आहेत. (Accused in police custody)

नाना पाटेकर अजूनही फरारच : रविवारी 1 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास बार्शी तालुक्यातील शिराळे गावच्या शिवारात फटाके फॅक्टरीत मोठा स्फोट होऊन चार महिला कामगारांचा मृत्यू झाला होता. या भीषण दुर्घनेनंतर सोलापूर जिल्हा प्रशासन हादरले होते. पोलिसांनी ताबडतोब फॅक्टरी मालक पांगरी गावातील युसूफ मणियार व फॅक्टरी चालक किंवा भागीदार नाना पाटेकर(रा उस्मानाबाद) यांवर भा.द.वि.304 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. घटना घडल्यापासून दोन्ही संशयित आरोपी फरार झाले होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास युसूफ मणियार यास ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांनी दिली.

ज्वारीच्या शेतात लपला होता : युसूफ मणियार हा ,दोन दिवसांपासून ज्वारीच्या शेतात लपला होता. घटना घडल्यापासून पांगरी गावातील युसुफचे अख्खे कुटुंब फरार झाले आहे. तर उस्मानाबाद येथील नाना पाटेकर हा देखील कुटुंबासोबत फरार झाला आहे. एका गुप्त बातमीदाराने पोलिसांनी माहिती दिली की, युसूफ हा शिराळे गावातील एका ज्वारीच्या शेतात आहे. पांगरी पोलिसांनी ताबडतोब सर्व शेताला चोहोबाजूंनी घेरून युसूफला ताब्यात घेतले. नाना पाटेकरला देखील लवकरच ताब्यात घेतले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.