पंढरपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी मित्र पक्षांना एकत्र घेऊन काम करत आहेत. सत्ता स्थापन झाल्यानंतर विरोधकांकडून महाविकास आघाडीचे सरकार दोन महिन्यात पडेल, तीन महिन्यात पडेल,असे सांगण्यात येत होते. मात्र विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यावर सरकार पडेल असा दावा केला होता, परंतु शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली. यात विजय मिळाल्याने पहिल्या चाचणीत महविकास आघाडी यशस्वी झाल्याचे, मत गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
पंढरपूर तालुक्यात सरकोली येथे आमदार भालके यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई आले होते. यावेळी त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पोलीस कर्मचारी दोषी आढळल्यास कारवाई -
चंद्रभागा नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच वाळू माफिया बरोबर पोलिस कर्मचार्यांचा सहभाग असणाऱ्या अनेक तक्रारी आहेत. पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे त्यांच्याशी बैठक घेऊन याविषयी लवकरच चर्चा करून वाळू चोरी थांबविण्याचा प्रयत्न करू, यामध्ये पोलीस प्रशासनाचा कोणताही कर्मचारी दोषी आढळल्यास कडक कारवाई, करण्याचा इशारा शंभूराजे देसाई यांनी दिला.
हेही वाचा - शेतकरी आंदोलनाकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष; शरद पवार 9 डिसेंबरला घेणार राष्ट्रपतींची भेट
हेही वाचा - बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहाराशी गिरीश महाजन यांचा संबंध नाही; भाजपने केला दावा