सोलापूर : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्यानंतर बीआरएस पक्ष सोलापुरात आपली पकड मजबूत करत आहे. सर्व पक्षांतील नेते बीआरएसचा झेंडा हाती घेत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपाला बीआरएस पक्षाशी तगडी फाईट करावी लागणार आहे. सोलापूर शहरातील भाजपा अल्पसंख्यांक आघाडीमधील पंचवीस जणांनी सामूहिक राजीनामा देत बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. सचिन सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली राजीनामा दिलेले सर्व जण हैदराबादकडं शनिवारी रात्रीच रवाना झाले आहेत. रविवारी सकाळी त्यांचा तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश सोहळा संपन्न झाला आहे.
बीआरएस पक्षानं उभं केलं आव्हान : सोलापूर शहराजवळ असलेल्या हैदराबादकरांनी सोलापूरच्या राजकारणात ढवळाढवळ सुरू केल्यानं सर्वच पक्षात अस्वस्थता पसरली आहे. बीआरएस पक्ष सोलापुरातील काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना या सर्वच पक्षांना टार्गेट करत आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत बीआरएस पक्षाशी तगडी फाईट करावी लागणार आहे. काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना या सर्व पक्षासमोर बीआरएसनं मोठं आव्हान उभं केलं आहे.
बीआरएस पक्षांना पाडले खिंडार : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा दोन महिन्यांपूर्वी सोलापूर दौरा झाला होता. तेलंगाणाच्या बीआरएस पक्षानं महाराष्ट्रात एन्ट्री केल्यानं सर्वच पक्षातील नेत्यांना धडकी भरली आहे. बीआरएसनं दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. बीआरएसकडून राज्यातील आगामी निवडणुका लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. बीआरएसच्या एन्ट्रीनं सोलापुरातील काँग्रेसचे धर्मण्णा सादुल, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके, भाजपामधील दक्षिण सोलापूर तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. सर्वच पक्षांना बीआरएसनं धक्का देत खिंडार पाडलं आहे.
सामूहिक राजीनाम्यानं भाजपाला जबर धक्का : सोलापूर भाजपा अल्पसंख्यांक आघाडीच्या 25 पदाधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी आपल्या सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा देत भाजपला जबर धक्का दिला आहे. भाजपाचा राजीनामा दिलेले हे सर्व पदाधिकारी बीआरएसचा झेंडा हातात घेऊन हैदराबादकडं रवाना झाले आहेत. 2024 च्या विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
हेही वाचा -