ETV Bharat / state

वस्तादानी दिलेला शब्द पाळला; सिकंदर शेखची जन्मभूमीत काढली हत्तीवरून मिरवणूक

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) झाल्यानंतर पैलवान सिकंदर शेखची (Sikandar Shaikh) मोहोळमध्ये जल्लोषत हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली.

Maharashtra Kesari Sikandar Shaikh
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 3:47 PM IST

प्रतिक्रिया देताना पैलवान सिकंदर शेख

सोलापूर Maharashtra Kesari : मूळचा सोलापूरचा असलेल्या सिकंदर शेख याची मोहोळमध्ये जंगी मिरवणूक काढण्यात आली. महाराष्ट्र केसरीची गदा जिंकल्या नंतर पहिल्यांदाच सिकंदर शेख जन्मभूमीत आला होता. रविवारी सकाळी सिकंदर शेखची ग्रामस्थांनी थाटामाटात मिरवणूक काढली. सिकंदर शेखला गरिबीत मदत करणारे रमेश बारस्कर (Ramesh Baraskar) यांनी हत्ती आणला होता. मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर यांनी तीन वर्षांपूर्वी सातारा येथे सिकंदरला शब्द दिला होता. सिकंदर तू 'महाराष्ट्र केसरी' (Maharashtra Kesari) झाला तर तुझी मोहोळमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढली जाईल. तो क्षण आज आला आणि त्याचं मला खूप आनंद झाला आहे, असं सिकंदरने माध्यमांना बोलताना सांगितलं.

भविष्यात डीवायएसपी, हिंद केसरी होणार : रमेश बारस्कर यांनी मोहोळमध्ये सिकंदर शेखचा जाहीर सत्कार केला. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने माध्यमांसमोर मनातील सर्व इच्छा व्यक्त केल्या. भविष्यात हिंद केसरी, ऑलम्पिक आणि डीवायएसपी होणार आहे. जानेवारी महिन्यात उपांत्यफेरीत पंचाच्या निर्णयामुळं मला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं होतं. परंतु, त्यावेळी मी सर्व महाराष्ट्र राज्यातील कुस्तीप्रेमींना, माझ्या चाहत्यांना, तसेच सोलापूरकरांना शब्द दिला होता. महाराष्ट्र केसरी बनून राहणार, तो शब्द आज पूर्ण केला आहे. महाराष्ट्र शासनाने किंवा मुख्यमंत्र्यांनी मला डीवायएसपीची शासकीय नोकरी द्यावी, कारण मला देखील खाकीची आवड आहे. मी भारतासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळून मेडल आणणार असं सिकंदरने सांगितलं.

धाराशिव मधील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत भाग घेणार नाही : पुणे शहरात 66 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदरने गदा पटकावली आहे. तर धाराशिवमध्ये 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू आहे. मी आता 66 वा महाराष्ट्र केसरी झालो आहे. धाराशिव मधील कुस्ती स्पर्धेत भाग घेणार नसल्याचं सिकंदरनं स्पष्ट केलं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवानांचे राजकारण होऊ नये, असं कुस्ती स्पर्धा आयोजकांना सिकंदरने आवाहन केलं आहे. धारशिवमध्ये होत असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा बरोबर आहेत. दोन्ही स्पर्धामधील प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखनं घेतली श्रीमंत शाहू महाराजांची भेट
  2. Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखनं घेतली जितेंद्र आव्हाडांची भेट; तर सिकंदर शेखला जिंकायचं आहे ऑलम्पिक मेडल
  3. Sikandar Shaikh won Maharashtra Kesari : पै सिकंदर शेखला यावर्षीचा महाराष्ट्र केसरी, शिवराज राक्षेला एका मिनिटात केलं चितपट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.