सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून केलेला देशाचा विकास महाराष्ट्रातील जनतेने पाहिला. तसेच देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेत काम केले. यासोबतच, मीदेखील सोलापूरमध्ये थोड्याफार प्रमाणात विकासकामे करण्याचा प्रयत्न गेल्या चार वर्षांमध्ये केला. हे सर्व जनतेने पाहिले, त्यामुळेच पुन्हा एकदा भाजपवर आणि माझ्यावर विश्वास दाखवत लोकांनी मला निवडून दिले, असे मत सोलापूर दक्षिण मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी बोलताना, सर्व मतदारांचे आभार मानत, मतदारांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला आपण तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाहीदेखील देशमुख यांनी दिली.
हेही वाचा : सोलापूर : प्रणिती शिंदे आणि भारत भालके यांची विजयी हॅट्ट्रीक