ETV Bharat / state

अंनिसने केली 170व्या महिलेची जटेतून मुक्तता

आपल्या समाजामध्ये आजही काही ठिकाणी देवदासीसारख्या अनिष्ट प्रथा मानल्या जातात. या देवदासींच्या डोक्यावर लांब आणि अवजड जटा ठेवलेल्या असतात. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने अशा महिलांच्या डोक्यातून जटा काढल्या जातात.

clotted hair
जटेतून मुक्तता
author img

By

Published : Sep 12, 2020, 3:47 PM IST

पुणे - महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी 170व्या महिलेची जटेतून मुक्तता केली. पंढरपूर येथे राहणार्‍या सीताबाई भजनावळे यांच्या डोक्यात गेल्या 30 वर्षापासून जट होती. चार फुट लांबीच्या या जटेतून त्यांची आज मुक्तता करण्यात आली.

पंढरपूर येथील रेणुका इनामदार व सिताबाई भजनावळे यांची जटेतून मुक्तता करण्यात आली

पंढरपूर येथील रेणुका इनामदार (वय 35) यांच्या डोक्यात गेल्या दोन वर्षांपासून जट झाली होती. त्यामुळे त्यांना शारीरिक व मानसिक त्रास होत होता. जट काढण्यासाठी त्यांना बराच खर्च करावा लागेल, असे सांगण्यात आले होते. तेव्हा त्यांनी सोशल मीडियावरती जट निर्मूलनाचे व्हिडिओ पाहिले व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव यांच्याशी संपर्क केला. रेणुका या देवदासी असल्यामुळे त्यांच्यावर सतत दबाव आणला जात होता. जट कापली तर वाईट होईल, त्याची पूजा करावी लागेल आणि बराच खर्चही करावा लागेल. त्यांनी ही गोष्ट अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांच्या कानावर घातली. जाधव यांनी त्यांच्या घरातील सर्वांचे समुपदेशन करून रेणुकाच्या डोक्यात असलेली जट काढली.

रेणुका इनामदार यांची मावशी सिताबाई भजनावळे (वय 60 वर्ष ) याही देवदासी आहेत. त्यांच्याही डोक्यात 30 वर्षापासून जट असल्याची माहिती अंनिसच्या नंदिनी जाधव यांना मिळाली. सीताबाई भजनावळे यांना देखील रेणुका इनामदार यांच्या घरी बोलावून त्यांचीही जटेतून मुक्तता करण्यात आली.

सिताबाई भजनावळे यांनी जट काढण्यासाठी अनेक वेळा पूजा-अर्चना केली. तसेच 30 ते 40 हजार रुपयांचा खर्चही केला. मात्र, जटेचा त्रास काही कमी झाला नाही. या वाढलेल्या जटेमुळे त्यांच्या मानेला व पाठीला खूप त्रास होत होता. सीताबाई यांना इतर महिलांच्या जटा काढलेले व्हिडीओ दाखवले. जट काढल्याने कोणाचे काहीही वाईट झाले नाही हे बघून त्यांनी लगेचच जट काढण्यास होकार दिला. अशा पद्धतीने आज दोन देवदासींची जटेतून मुक्तता करण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी दिली.

केसात जटा झालेल्या स्त्रियांच्या मनातील भीती दूर करायची, त्यांना जटा सोडवून घेण्यासाठी तयार करायचे, केसातील जटा सोडवायच्या, त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यायचे आणि वेळोवेळी समुपदेशन करायचे, असे प्रयत्न अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. अंनिसच्या माध्यमातून गावोगावी जाऊन अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही नंदिनी जाधव यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.