माढा (सोलापूर) : येथील सायकल क्लबच्या दोन सदस्यांनी माढा ते तिरुपती ( Madha To Tirupati Cycle Riding ) असा 1640 किलोमीटरचा सायकलवरुन प्रवास आठ दिवसांत पूर्ण करत 'प्रदुषण टाळा, आरोग्यदायी जीवनासाठी सायकल वापरा' ( Save Envorinment Slogen ) हा संदेश दिला. संतोष दत्तु चव्हाण आणि सचिन भिमराव बंडगर अशी या सायकल प्रवास पुर्ण करणाऱ्या दोघांची नावे आहे.
ठिकठिकाणी ज्वलंत प्रश्नांचे प्रबोधन
माढा सायकल क्लबचे ( Madha cycle Club ) 30 सदस्य आहेत. ते दररोज विविध भागात 40 ते 50 किलोमीटर सायकलने प्रवास करतात. आपणही लांबचे अंतर सायकलने गाठावे, अशी जिद्द संतोष चव्हाण व सचिन बंडगर यांनी बाळगली होती. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी माढा ते तिरुपती असा सायकलने प्रवास केला. माढा सोलापूर, गुलबर्गा मार्गे ते तिरुपती ला ४ दिवसांत पोहचले. प्रति तास 18 ते 20 किलोमीटर ते अंतर पार करत. यावेळी त्यांनी ठिकठिकाणी गावांत थांबुन प्रदुषण टाळा - सायकल वापरा, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्री भ्रूण हत्या, हुंडा, अनिष्ट प्रथा या ज्वलंत प्रश्नांचे प्रबोधन केले.
संपत्ती पेक्षा आरोग्य महत्वाचे
लाख मोलाची शरीर संपदा निरोगी ठेवण्यासाठी सायकलचा वापर करणे काळची गरच बनली आहे. वाढत्या चरबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सायकलचा प्रवास आवश्यक आहे. संपत्ती पेक्षा आरोग्य महत्वाचे आहे. यामुळे नागरिकांनी प्रेरणा घेऊन सायकलचा प्रवास सुरु करावा, अशी प्रतिक्रिया संतोष चव्हाण आणि सचिन बंडगर यांनी बोलताना दिली.