सोलापूर - माढा शहरात १३ ठिकाणी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे व पिए (पब्लिक अनाउन्स) सिस्टीम मुळे घटना घडामोडी, बेशिस्त वाहतुकीसह गुन्हेगारीवर निश्चितच वचक बसणार असून शहरावर वाॅच असणार आहे. माढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या पुढाकारातून ही यंत्रणा कार्यान्वित झाली असून पोलीस स्टेशनचा लुकदेखील त्यांनी बदलला आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे नव्याने कार्यान्वित -
पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी गुरुवारी माढा पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी करीत आढावा घेत पोलीस ठाण्याची विभागनिहाय पाहणी करुन कामकाजाबाबत समाधान व्यक्त करुन आढावा घेत आवश्यक सुचना यावेळी दिल्या. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेला आलेल्या यशाबद्दल माढा पोलिसांचे संबधित ग्रामस्थांचे अभिनंदन केले.
माढा पोलीस ठाण्याचे तत्कालिन पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. मात्र, काही महिन्यानंतर ते काही तांत्रिक अडचणीमुळे दुरुस्ती अभावी बंदच राहिले. अनेक अधिकारी येऊन पदभार घेऊन बदल्या झाल्याने गेले. मात्र कॅमेरे दुरुस्तीचे मनावर कुणी घेतले नव्हते. मागील ६ महिन्यापूर्वी पदभार घेतलेले सहायक पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी बंद स्थितीत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे नव्याने कार्यान्वित करण्याबरोबरच वाईस सिस्टीम देखील सुरु करुन कामाची चुणूक दाखवत पोलिस स्टेशनचा चेहरा मोहरा (कायापालट केला ) बदलला आहे.
हे केलेत बदल -
अपुरा पडत असलेला ठाणे अंमलदार कक्ष सुसज्ज सोयीयुक्त नुतनीकरण केला. जनरेटरची व्यवस्था करुन पूर्ण वायरिंग /लाईट वायर बदलली, पोलीस ठाण्यासमोरच लावलेली जप्त कारवाईतील वाहनांना एका बंदिस्त जागेत व्यवस्थित ठेवले. सर्व कक्षात आवश्यक बदल केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक बुवा यांचा कक्षदेखील तक्रारी साठी अथवा भेटावयास येणाऱ्या नागरीकांना प्रसन्नदायी वाटेल असा केला. पोलीस ठाण्याचा विद्युत फलक, सभोवताली लावलेले आकर्षक विद्युत दिवे, पोलीस ठाण्याचा परिसर चकाचक केला.
कॅमेरे साऊन्ड सिस्टीम मुळे शिस्त लागणार -
शहरात दर्जेदार गुणवत्तेचे १३ ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामुळे सर्वच घटना घडामोडीवर वचक राहणार आहे. तसेच कॅमेराला लावण्यात आलेल्या अनाऊन्समेंट यंत्रणेमुळे वाहतुकीला शिस्त लावणेसाठी बेशिस्त वाहनचालकांसह, आपत्कालीन परिस्थितीत तसेच पोलीस ठाण्यातून शहरवासियांना माहिती देण्यासह काही आवाहन करण्यासाठी या यंत्रणेचा वापर करता येणार आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थीनीमध्ये देखील सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून रोडरोमिओंमुळे चाप बसणार आहे.
अनेक महिन्यांपासून सीसीटिव्ही कॅमेरे बंद होते ते पहिल्यादा सुरु केले. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासह भेटावयास आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी ठाणे अंमलदार कक्षात जागा नव्हती. पोलिस अंमलदार अधिकारी, की तक्रार द्यायला आलेला नागरिक, महिला या सर्वानाच चांगले प्रसन्नदायी वातावरण वाटावे. याच विचारातून हा सर्व बदल केला आहे. काम केल्याचे फार मोठं समाधान वाटत आहे. रोडरोमियोना जागेवरच शिक्षा दिली जाणार आहे, अशी प्रतिक्रिया शाम बुवा यांनी दिली.
हेही वाचा - Devendra Fadnavis In Amravati : हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर