ETV Bharat / state

माढ्यात मोहिते पाटलांचा राष्ट्रवादीला 'जोर का झटका', माळशिरसमधून भाजपला १ लाखाचे मताधिक्य

author img

By

Published : May 25, 2019, 3:33 PM IST

माढा मतदारसंघात अकलूजच्या मोहिते पाटलांनी त्यांचे वर्चस्व दाखवले आहे. त्यांच्या हक्काच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून त्यांनी भाजपच्या निंबाळकरांना 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य देऊन राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का दिला.

माढ्यात मोहिते पाटलांचा राष्ट्रवादीला 'जोर का झटका'

सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, यावेळच्या निवडणुकीत हा बालेकिल्ला मिळवण्यात भाजपला यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिलेदार असलेल्या मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला माढा मतदारसंघात जोर का झटका दिला आहे. या मतदारसंघातील निवडणुक ही मोहिते पाटील विरुद्ध शरद पवार अशीच झाल्याचे पाहायला मिळाल. यामध्ये मोहिते पाटील यांनी वर्चस्व राहिले.

माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. तर त्यांच्या विरोधात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत अकलूजच्या मोहिते पाटलांनी त्यांचे वर्चस्व दाखवत त्यांच्या हक्काच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या निंबाळकरांना 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य देऊन राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का दिला.

लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यामुळे 2009 मध्ये माढ्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक लढविली होती. येथून ते जिंकूनही आले. त्यानंतर 2014 मध्ये मोदी लाट असतानाही विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. माढा लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत पूर्वी हा मतदारसंघ पंढरपूर मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. या पंढरपूर मतदारसंघात राज्याच्या निर्मितीनंतर कायम काँग्रेसचीच सत्ता राहिलेली आहे. काँग्रेसचे संदिपान थोरात ७ वेळा पंढरपूर मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर आरपीआयचे रामदास आठवले हे २ वेळा खासदार राहिले. लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि 2008 नंतर अस्तित्वात आलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला होता. त्यामुळे राज्याच्या निर्मितीनंतर या मतदारसंघावर सुरुवातीला काँग्रेसची आणि नंतर राष्ट्रवादीची सत्ता राहिली आहे.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात प्रथमच भाजपचे कमळ फुलले आहे. या मतदारसंघात भाजपची ताकद नसली तरीही भाजपने ऐनवेळी सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शरद पवारांचे शिलेदार असलेल्या मोहिते पाटलांना सोबत घेतले आणि माढ्यात इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलविले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे रणजितसिंह यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले. भाजपने साताऱ्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्याचा विडा अकलूजच्या मोहिते-पाटील यांनी उचलला आणि त्यांच्या माळशिरस मतदारसंघातून १ लाख ६०० एवढे मताधिक्य देऊन माढ्यात भाजपचा विजय केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्यातील उमेदवार संजय मामा शिंदे हे ३ ते ४ वर्षापासून भाजपच्या खूप जवळ गेले होते. संजयमामा शिंदे यांनी भाजपला सोबत घेत सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही मिळवले होते. तसेच त्यापूर्वी सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असताना देखील भाजप पुरस्कृत उमेदवार निवडून आणण्याची किमया केली होती. भाजप सोबत असल्यामुळे माढा लोकसभेसाठी संजयमामा शिंदे यांना भाजपकडून उमेदवारी देऊ केली होती. मात्र, संजय शिंदे यांनी भाजपकडून उमेदवारी नाकारत माढ्यातून राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली. मात्र या मतदारसंघातत्यांना मोठा फटका बसला आहे.

माढा विधानसभा मतदारसंघात संजय शिंदे यांना फक्त ५ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. तर करमाळा विधानसभा मतदारसंघात 30 हजार एवढे मताधिक्य मिळाले. विधानपरिषदेचे सभापती असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण मतदारसंघात भाजपला 2 हजार मतांची आघाडी मिळाली आहे. तर दुसरीकडे सांगोला विधानसभा मतदारसंघात शेकापचे वर्चस्व असतानादेखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फक्त 3 हजार 300 मतांची आघाडी मिळाली आहे. माढा लोकसभेच्या ६ विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला करमाळा माढा आणि सांगोला या ३ विधानसभा मध्ये आघाडी मिळाली आहे. त्यातही करमाळा विधानसभेतच 30 हजार आघाडी आहे.

सांगोला आणि माढा या दोन विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणावी तेवढी आघाडी घेता आली नाही. तर दुसरीकडे अकलूजच्या मोहिते-पाटील यांनी त्यांचा हक्काचा असलेल्या माळशिरस या मतदारसंघातून तब्बल १ लाख ६०० मताधिक्य भाजपला दिले. माण खटामधून काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजप उमेदवाराला उघड पाठिंबा देत माण खटाव विधानसभा मतदारसंघातील 25 हजारांचे मताधिक्य भाजपला दिले. फक्त याच दोन मतदारसंघावर भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे.

Intro:R_MH_SOL_25_MAY_2019_MADHA_RESULT_OVERALL_PTC_S_PAWAR

माढ्यात मोहिते पाटलांचा राष्ट्रवादीला जोर का झटका
माळशिरस मधून लाखापेक्षा जास्त मताधिक्य देऊन वर्चस्व

सोलापूर-
संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शिलेदार असलेल्या मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला माढा लोकसभा मतदारसंघात जोर का झटका दिलाय. भारतातील निवडणुकी पक्षावर न होता मोहिते पाटील विरुद्ध शरद पवार अशीच झाली आणि या निवडणुकीत अकलूजच्या मोहिते पाटलांनी त्यांचं वर्चस्व दाखवत त्यांच्या हक्काच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या माढातच राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव दाखविला आहे.

Body:माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यामुळे 2009 मध्ये माढ्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक लढविली आणि ते जिंकूनही आले त्यानंतर 2014मध्ये मोदी लाट असतांनाही विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविला. माढा लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचने पूर्वी हा मतदारसंघ पंढरपूर मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. या पंढरपूर मतदारसंघात राज्याच्या निर्मितीनंतर कायम काँग्रेसचीच सत्ता राहिलेली आहे काँग्रेसचे संदिपान थोरात सात वेळा पंढरपूर मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर आरपीआयचे रामदास आठवले हे दोन वेळा खासदार राहिले. लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि 2008 नंतर अस्तित्वात आलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला होता. त्यामुळे राज्याच्या निर्मितीनंतर या मतदारसंघावर सुरुवातीला काँग्रेसची आणि नंतर राष्ट्रवादीची सत्ता राहिली आहे.
या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात प्रथमच भाजपचे कमळ फुलले आहे या मतदारसंघात भाजपची ताकद नसली तरीही ही भाजपने ऐनवेळी सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शरद पवारांचे शिलेदार असलेल्या मोहिते पाटलांना सोबत घेतले आणि माढ्यात इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलविले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे रणजितसिंह यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले.
भाजपने साताऱ्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्याचा विडा अकलूजच्या मोहिते-पाटील यांनी उचलला आणि त्यांच्या माळशिरस मतदारसंघातून एक लाख सहाशे एवढे मताधिक्य देऊन माढ्यात भाजपचा विजय केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माझ्यातील उमेदवार संजय मामा शिंदे हे तीन-चार वर्षापासून भाजपच्या खूप जवळ गेले होते संजय मामा शिंदे यांनी भाजपला सोबत घेत सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही मिळवले तसेच त्यापूर्वी सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असताना देखील भाजप पुरस्कृत उमेदवार निवडून आणण्याची किमया केली होती भाजपचा सोबत असल्यामुळे माढा लोकसभेसाठी संजय मामा शिंदे यांना भाजपकडून उमेदवारी देऊ केली होती मात्र संजय शिंदे यांनी भाजपकडून उमेदवारी नाकारत माढ्यातून राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली. संजय मामा शिंदे यांचा घरचा मतदारसंघात असलेल्या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र त्यांना मोठा फटका बसलेला आहे माढा विधानसभा मतदारसंघात संजय शिंदे यांना फक्त पाच हजारांचे मताधिक्य मिळाले आहे तर करमाळा विधानसभा मतदार संघात 30000 एवढे मताधिक्य मिळाले विधान परिषदेचे सभापती असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण या मतदारसंघात भाजपला 2000 मतांची आघाडी मिळाली आहे तर दुसरीकडे सांगोला विधानसभा मतदारसंघात शेकापचे वर्चस्व असतानादेखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फक्त 3300 मतांची आघाडी मिळाली आहे. माढा लोकसभेच्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला करमाळा माढा आणि सांगोला या तीन विधानसभा मध्ये आघाडी मिळाली आहे त्यातही ही करमाळा विधानसभेतच 30000 आघाडी आहे तर सांगोला आणि माढा या दोन विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणावी तेवढी आघाडी घेता आली नाही ही तर दुसरीकडे अकलूजच्या मोहिते-पाटील यांनी त्यांचा हक्काचा असलेल्या माळशिरस या मतदारसंघातून तब्बल एक लाख सहाशे भाजपच्या उमेदवारांना दिले तर दुसरीकडे मान खतांमधून काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजप उमेदवाराला उघड पाठिंबा देत माण खटाव विधानसभा मतदारसंघातील 25 हजारांचे मताधिक्य हे हे भाजपच्या उमेदवाराला दिल्यामुळे फक्त याच दोन मतदारसंघावर भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे.
माढ्यातील या विजयामध्ये सर्वात मोठा वाटा हा मोहिते-पाटील कुटुंबियांचा आहे. अकलूजच्या मोहिते-पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडून त्यांची ताकद दाखविली आणि माऱ्यात शरद पवार आणि राष्ट्रवादीला जोर का झटका देत अजूनही सिंहाच्या जातात आणि पंजाब ताकद शिल्लक असल्याचे दाखवून दिले आहे.

Conclusion:नोट- सोबत वॉक थ्रू आणि 1 टू 1 पाठवीत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.