ETV Bharat / state

Lungi Gang Arrest : पुणे-सोलापूर महामार्गावर लूटमार करणाऱ्या लुंगी गँगच्या मुसक्या आवळल्या; 43 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सोलापूर पुणे महामार्गावर लुंगी परिधान केलेल्या व्यक्तींनी मारहाण करून तीन नवीन कार पळविल्या होत्या, अशी तक्रार मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. तक्रार दाखल झाल्यापासून पुणे सोलापूर महामार्गवर लुंगी गँगची दहशत निर्माण ( Lungi gang arrest in solapur ) झाली होती. मोहोळ पोलिसांनी वेळीच लुंगी गँगच्या मुसक्या आवळल्यामुळे महामार्गावर वाहतूक करणाऱ्यांचा जीव भांड्यात ( terror of Lungi gang ) पडला आहे.

लुंगी गँगच्या मुसक्या आवळल्या
author img

By

Published : Mar 1, 2022, 5:05 PM IST

Updated : Mar 1, 2022, 5:19 PM IST

सोलापूर- नवीन कार शोरुमला घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाला रस्त्यात अडवून मारहाण करून तीन नवीन कार पळविणाऱ्या टोळीला मोहोळ गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक केली ( Mohol crime branch arrest Police ) आहे. पोलिसांनी अवघ्या 24 तासात हैदराबाद येथून जेरबंद करून त्यांना बेड्या ठोकल्या ( gangster arrest from Hyderabad ) आहेत. याबाबत मोहोळ पोलिसांच्यावतीने मंगळवारी 1 मार्च रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला माहिती देण्यात आली.

सोलापूर पुणे महामार्गावर लुंगी परिधान केलेल्या व्यक्तींनी मारहाण करून तीन नवीन कार पळविल्या होत्या, अशी तक्रार मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. तक्रार दाखल झाल्यापासून पुणे सोलापूर महामार्गवर लुंगी गँगची दहशत निर्माण ( Lungi gang arrest in solapur ) झाली होती. मोहोळ पोलिसांनी वेळीच लुंगी गँगच्या मुसक्या आवळल्यामुळे महामार्गावर वाहतूक करणाऱ्यांचा जीव भांड्यात ( terror of Lungi gang ) पडला आहे.

लूटमार करणाऱ्या लुंगी गँगच्या मुसक्या आवळल्या

हेही वाचा-Thane Crime News : उल्हासनगरमध्ये अज्ञाताकडून महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला; प्रकृती चिंताजनक

जीपीआरएस वरून चोरीला गेलेल्या कारचा शोध-
चोरीस गेलेल्या कारचे जीपीआरएस तात्काळ उपलब्ध करून कारचे लोकेशन हैदराबाद येथे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ ठिकाणी रवाना होवून शहानिशा केली. या कार हैदराबाद येथील कुकटपल्ली येथील रामदेवराव हॉस्पीटलमधील पार्किंग मध्ये असल्याचे समजले. स्थानिक पोलीसांच्या मदतीने सदर ठिकाणी जावून मिळून आलेल्या कारच्या जवळ पोलिसांनी पाळत ठेवली होती.

हेही वाचा-Youth Arrested for Theft Bike : टाळेबंदीमुळे गेली नोकरी, नव्या नोकरीसाठी उच्च शिक्षित तरुणाने केली दुचाकी चोरी

चार तासानंतर संशयित तीन आरोपी कार जवळ आले-
हैदराबाद पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांनी पार्किंग ठिकाणी पाळत ठेवली होती. पार्किंग केलेल्या ठिकाणी चार तासानंतर संशयीत तीन इसम कारच्या जवळ आले. लुंगी गँगमधील संशयितांना कळण्याअगोदर त्यांना पोलिसांनी पकडले. संशयित तिघांबरोबर आणखीन दोघे होते. हे दोघे संशयीत चोरटे त्यांच्या ताब्यात असलेली काळ्या रंगाची सोनेट कारमध्ये बसून पळून गेले. त्यांना आपणही सापडू या भीतीने त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाची कार थोडया अंतरावर रोडच्या बाजूस सोडून पळून गेले.

हेही वाचा-Principal Beating Student in Nashik : विद्यार्थ्याला बेदम मारहाण, महिला प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल

लुंगी गँगमधील या तिघांना ठोकल्या बेड्या-
पोलिसांनी दोन कार हस्तगत केल्या आहेत. त्याचबरोबर तीन संशयीत आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये नियाज रशीद मोहमंद (वय ३० वर्षे ) बलीत मोहल्ला गाव सपनकी ता. हथीन जि. पलवन राज्य- हरीयाना), शोएब मोहमंद सय्यद (वय ३५ वर्षे, रा. गणेश पेठ बेटुगल्ली चाळ दुबळी ता. हुबळी जि.धारवाड राज्य कर्नाटक), शेखरगोडा दुड्डानागौडा हळ्ळी (वय ५२ वर्षे रा. ता. बेल्लाळी, राज्य कर्नाटक) यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी काळ्या रंगाची कारही पकडली आहे. दोन संशयीत आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाले. पोलिसांनी ४३ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई करण्यात मोहोळ पोलिसांनी परिश्रम घेतले आहे-
लुंगी गँगच्या मुसक्या आवळण्यात मोहोळ पोलीस ठाणचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर , पीएसआय संतोष माने, शरद ढावरे, पांडुरंग जगताप, लखन घाडगे यांनी कामगिरी केली. पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

Last Updated : Mar 1, 2022, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.