ETV Bharat / state

प्रेयसीशी लग्न करण्यासाठी गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप

बार्शी येथील न्यायालयाने महेश भारत मिसाळ या व्यक्तीस गर्भवती पत्नीच्या खून प्रकरणात जन्मठेप सुनावली आहे. जानेवारी 2018मध्ये प्रेयसीशी लग्न करण्यासाठी पत्नीच्या डोक्यात दगड घालून व चाकूने वार करत त्याने खून केला होता. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेप व 25 हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.

आरोपी
आरोपी
author img

By

Published : Nov 7, 2020, 5:09 PM IST

Updated : Nov 7, 2020, 8:10 PM IST

सोलापूर - बार्शी येथील न्यायालयाने महेश भारत मिसाळ (वय 24 वर्षे , रा. खामसवाडी, कळंब, उस्मानाबाद) याला गर्भवती पत्नीचा खून प्रकरणी जन्मठेप सुनावली आहे. महेश मिसाळ याला प्रेयसीसोबत लग्न करायचे होते. त्यामुळे त्याने पत्नीस फिरण्यास रानात नेले. त्यानंतर चाकूने भोसकून व डोक्यात दगड घालून तिचा खून केला. याबाबत त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

बोलताना विधिज्ञ
  • पत्नीला प्रेमसंबंधाबाबत समजले होते

मनीषा दादाराव फुगारे हीचा विवाह 7 मे 2017 रोजी महेश मिसाळसोबत झाला होता. महेश हा पत्नी मनीषा हिला घेऊन पुणे येथे राहत होता. पण, महेशचे नात्यातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. तिच्या नेहमी संपर्कात होता. ही बाब मनीषाच्या लक्षात आली होती. यामुळे मनिषाने यास विरोध केला होता.

  • असा केला खून

मनीषा याचे माहेर बार्शी येथील कोंबडवाडी येथील आहे. गर्भवती असल्याने महेश पत्नीला जानेवारी, 2018 मध्ये माहेरी आणले होता. त्यानंतर त्याने सासरवाडीतून मेव्हणीकडे पाथरी येथे जाण्यासाठी तिला घेऊन निघाला होता. पाथरी येथे महेश मिसाळने आपली दुचाकी माळरानात आडवाटेने वळविली. त्यानंतर काही अंतरावर जात लघुशंकेचे कारण सांगत दुचाकी थांबवली. मनीषाचे आपल्याकडे लक्ष नसल्याचा फायदा घेत त्याने मागून येत त्याच्या डोक्यात दगड घातला आणि चाकूने भोसकले. यातच तिचा मृत्यू झाला.

  • लूटमार झाल्याचा केला होता बनाव

महेश मिसाळ याने स्वतःवर देखील 18 वार करून उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाला. काही जण लूटमार करण्यासाठी आले आणि मला व माझ्या पत्नीला मारहाण करून लूटमार करून निघून गेले, अशी तक्रार त्याने पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी मनीषाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पंचनामा केला. पण, महेशची तक्रार व घटनास्थळावरील दृश्य यामध्ये तफावत आढळत होती. त्यामुळे पोलिसांनी याची कसून तपासणी करत खरी माहिती समोर आणली आणि महेश यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.

  • असा झाला युक्तीवाद

याबाबत न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना असे सांगितले की, गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून अज्ञात लोकांनी मारहाण केली आहे. यातच मनीषाचा खून झाला आहे. पण, सरकारपक्षाने निदर्शनास आणले की, मारहाण करणाऱ्यांनी, महेशला सोडून मनीषाला का एवढी जबर मारहाण केली? मुख्य रस्ता सोडून 400 ते 500 फूट माळरानात ही घटना घडली, तर महेश त्या रस्त्याला गेलाच कसा, असे युक्तिवाद केला.

  • आजन्म कारावास व 25 हजार रुपये दंड

दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून शेवटी जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. ब. भस्मे यांनी महेशने कट रचून गर्भवती पत्नीचा खून केला आहे, असा निकाल देत आजीवन कारावासाची शिक्षा व 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये आरोपीतर्फे अ‌ॅड. मिलिंद थोबडे, सरकारतर्फे अ‌ॅडड शांतवीर महिंद्रकर यांनी काम पाहिले. या खटल्यात एकही प्रत्यक्ष साक्षीदार नसतानाही शिक्षा झाली.

हेही वाचा - मराठा आरक्षण आंदोलन LIVE : पंढरपुरात आक्रोश, तर वांद्रामध्ये मशाल मोर्चा..

हेही वाचा - पंढरपुरात तणाव! संचारबंदी लागू, शहराकडे येणारे रस्ते बंद, मराठा समाज मात्र आक्रोश मोर्चावर ठाम

Last Updated : Nov 7, 2020, 8:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.