ETV Bharat / state

करमाळा तालुक्यात बिबट्याची दहशत; चार दिवसात घेतला दोघांचा बळी - Leopard attack in Solapur district

बिबट्याच्या हल्ल्यात दोघांचे बळी गेल्याने करमाळा तालुक्यात घबरावटीचे वातावरण तयार झाले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी बीड, सोलापूर व अहमदनगर वनखात्याच्या टीमसह करमाळा पोलीस सज्ज सज्ज झाले आहेत.

बिबट्या
बिबट्या
author img

By

Published : Dec 5, 2020, 10:39 PM IST

Updated : Dec 6, 2020, 11:25 AM IST

पंढरपूर (सोलापूर) - गेल्या चार-पाच दिवसांपासून करमाळा तालुक्यात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. बिबट्याच्या अंजनडोह गावात केलेल्या हल्ल्यात जयश्री दयानंद शिंदे (वय. 26) या महिलेला ठार केले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात तालुक्यात दुसरा बळी गेला आहे.

करमाळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका तरुण व महिलेला जीव गमवावा लागला आहे. यापूर्वी 3 डिसेंबरला कल्याण देविदास फुंदे (रा. लिंबेवाडी) याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. बिबट्याच्या हल्ल्यात दोघांचे बळी गेल्याने करमाळा तालुक्यात घबरावटीचे वातावरण तयार झाले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी बीड, सोलापूर व अहमदनगर वनखात्याच्या टीमसह करमाळा पोलीस सज्ज सज्ज झाले आहेत. करमाळा तालुक्यातील नागरिकांना पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी काळजी घेण्यासह महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

बिबट्या आष्टी व जामखेड तालुक्यातून लिंबेवाडी गावाकडे आला असण्याची शक्यता आहे. कारण आष्टी व परिसरात या बिबट्याने सात-आठ लोकांवर हल्ला केला आहे. लिंबेवाडी येथे नवव्या व्यक्तीवर हल्ला केला आहे. त्यानंतर अंजनडोह गावात बिबट्याने महिलेवर हल्ला करून ठार केले आहे. हा हल्ला केलेला बिबट्या हा नरभक्षक असण्याची जास्त शक्यता आहे. बिबट्या नरभक्षक असण्याची जास्त शक्यता असल्याने सर्व नागरिकांनी अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे. वन विभागाकडून अहमदनगर, बीड, सोलापूर वन कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे.

हेही वाचा-शिर्डी साई देवस्थान : दक्षिण भरतातून येणाऱ्या भाविकासांठी 'मध्य रेल्वे'ची खूषखबर!

करमाळा तालुक्यात नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे-

करमाळा तालुक्यातील नदीकाठी व ओढ्याकाठी साधारणपणे झाडाझुडपांचे व बागायती पिकांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे बिबट्या नदी किंवा ओढ्याच्या काठाने प्रवास करतो. तसेच ज्या भागात बागायती पिके आहेत त्या भागातदेखील वास्तव्य करतो. त्यामुळे अशा भागातील लोकांनी अत्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे. सध्या ऊसतोडीचा हंगाम चालू असून ऊस तोडणीच्या टोळ्या उघड्यावर झोपड्या टाकून राहतात. उजनी जलाशयाच्या काठच्या बागायती भागात बिबट्या शिरल्यास त्याला शोधणे कठीण होणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी त्याला पकडण्यासाठी पोलीस व वन खात्याची मदत करणे आवश्यक आहे. ज्या भागात बिबट्या दिसला आहे त्या भागातील लोकांनी तात्काळ पोलिसांना व वनखात्याला कळवावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा-मुख्यमंत्र्यांचा 'समृद्धी महामार्ग' पाहणी दौरा, कार्यकर्त्यांना परवानगी माध्यमांना मात्र 'नो एंट्री'

Last Updated : Dec 6, 2020, 11:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.