सोलापूर : मोडनिंबहून पंढरपूरकडे निघालेली एक फॉर्च्युनर गाडी कालव्यात पडल्याने (Car falls into canal) झालेल्या अपघातामध्ये लावणी कलावंत (death of lavani artist in car accident) मीना देशमुख यांचा मृत्यू (death of lavani artist Meena Deshmukh) झाला. अन्य तीन जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना पंढरपूर तालुक्यात घडली आहे. latest news from Solapur, Solapur Crime, Lavani Artist Car Accident
लावणी कलावंत मीना देशमुख यांचा जागीच मृत्यू : मोडनिंबहून पंढरपूरकडे निघालेली फॉर्च्यूनर कार गाडी तालुक्यातील आष्टी व रोपळे गावच्या दरम्यान रस्त्यात असलेल्या एका कालव्यात कोसळली. या झालेल्या अपघातामध्ये लावणी कलावंत मीना देशमुख यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मीना देशमुख या मोडलिंब येथील दत्तनगर येथे राहत होत्या. यामध्ये तीन जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कार 50 फूट खाली कोसळली : या झालेल्या अपघातामध्ये मीना देशमुख यांची मुलगी अंबिका व दहा वर्ष वयाची नात जानवी यांच्यासह शुभम जाधव, नारायण शिंदे हे या अपघातामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पंढरपूर कुर्डूवाडी रस्त्यावरील काही ठिकाणी पुलाचे काम चालू असून ते कामकाज अपूर्ण आहे. भरधाव येणारी कार कालव्याजवळ आली असता पुलावरून खाली पन्नास फूट पडली तेव्हा हा अपघात झाला.