करमाळा (सोलापूर) - प्रतिवर्षी उजनी जलाशयावर पावसाळा हंगामात सरासरी ५०० ते ५५० मिलीमीटर पाऊस पडतो. अलीकडे याचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. मात्र, २०२० चा पावसाळा यास अपवाद ठरत आहे. २१ जुलैपर्यंत उजनी धरणावर ३९२ मि.मी..पर्जन्याची नोंद झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत येथे गेल्या २४ तासात तब्बल ९१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मागील दीड महिन्यात ३९२ मि.मी. पाऊस धरण परिसरात झाला आहे. मात्र, अशा पावसाची नोंद भीमा खोऱ्यातील अन्य धरणांवर नसल्याने उजनीत येणारी आवक इतके दिवस कमीच आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजता उजनी धरणाची पाणी पितळी ४९१.१०५ मीटर होती. एकूण पाणी साठा १८१७.६८ दशलक्ष घनमीटर असून यात १४.८७ दलघमी उपयुक्त पातळीत पाणीसाठा आहे. याची टक्केवारी ०.९८ टक्के इतकी आहे. धरण हळूहळू उपयुक्त पातळीत भरत आहे. दौंडची आवक २२२३ क्युसेक इतकीच स्थिर आहे.
यंदा वरुणराजा उजनीवर फिदा, गेल्या २४ तासात ९१ मिलीमाटर पावसाची नोंद - उजनी धरण न्यूज
प्रतिवर्षी उजनी जलाशयावर पावसाळा हंगामात सरासरी ५०० ते ५५० मिलीमीटर पाऊस पडतो. अलीकडे याचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. मात्र, २०२० चा पावसाळा यास अपवाद ठरत आहे. २१ जुलैपर्यंत उजनी धरणावर ३९२ मि.मी..पर्जन्याची नोंद झाली आहे.