पंढरपूर (सोलापूर) - कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील विविध धार्मिक स्थळे भाविकांच्या गर्दीमुळे गजबजून जात आहेत. नवीन वर्षाच्या पुत्रदा एकादशी निमित्ताने राज्यातून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी तोबा गर्दी केली. शनिवारी रात्रीपासून भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले. पंढरीत जवळपास अडीच लाख भाविक दर्शनासाठी आले आहेत. पंढरपूरच्या विठोबा मंदिरातील ऑनलाइन पास नोंदणी पद्धत रद्द केल्याचा परिणाम भाविकांची संख्या वाढण्यात झाल्याचे पाहायला मिळते.
व्यापारी व भाविकांकडून सुरक्षित अंतराचा फज्जा
पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी असल्याने विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. आज पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या भाविकांमुळे मुखदर्शनाची रांग मंदिरापासून किलोमीटर अंतरावर होती. शनिवारपासूनच पंढरपुरातील भक्त निवास, धर्मशाळा, लॉज हाऊसफुल्ल झाले होते. वर्षातील पहिल्या एकादशी दिवशी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मात्र, भाविकांनी अरुणा नियमांचे पालन न करण्याचे दिसून आले जवळपास सर्वच भाविकांच्या तोंडाला मास्क दिसले नाही. त्यामुळे करुणा वाढण्याची भीती आहे तर मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांकडून व भाविकांनी सोशल डिस्टंसिंग पूर्णपणे फज्जा उडाल्याचे दिसून आले
जानेवारीपासून ऑनलाइन पासची अट रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणीचे ऑनलाईन दर्शन सुविधा रद्द करून कोरोनाचे सर्व नियम पाळून 20 जानेवारी पासून दर्शन खुले करण्याचा निर्णय घेण्यात आलं आहे. यामध्ये 65 वर्षांवरील व्यक्ती व 10 वर्षा खालील लहान मुलांना मात्र प्रवेश बंदी कायम ठेवण्यात आली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत समितीची बैठक पार पडली होती. त्यामध्ये हा महत्वपूर्ण घेण्यात आला. त्या निर्णयाचा परिणाम आजच्या पंढरपूरमध्ये झालेल्या भाविकांच्या गर्दीवरुन दिसून येतो.