सोलापूर (पंढरपूर) - हिंदू संस्कृतीमध्ये विवाह सोहळ्यामध्ये परंपरा जपली जाते. हिंदू पद्धतीच्या विवाह सोहळ्यामध्ये वधू पक्षाकडून वर पक्षाला माहेरची देन म्हणून केरसुणी (झाडणी) देण्याची परंपरा आहे. या समारंभामध्ये केरसुणीला लक्ष्मीचा दर्जा दिला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये केरसुणी ही लक्ष्मी मानली जाते. त्यामुळे घरात सुख व समृद्धी धारण करते अशी धारणा मानली जाते.
भारतीय धार्मिक कार्यक्रमांमध्ये केरसुणीचे पूजन
भारतीय धार्मिक कार्यक्रमांमध्ये मूर्ती पूजेनंतर केरसुणी पुजण्याची परंपरा शेकडो वर्षाची आहे. केरसुणीला लक्ष्मीचे प्रतीकही मानले जाते. झाडूमुळे घरात अनेकवेळा अशुभ गोष्टी घडू लागतात. जर झाडू मारताना सावधगिरी बाळगली नाही तर घरातील संपूर्ण भराभराट निघून जाईल असा समज हिंदू संस्कृतीमध्ये आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये काम करण्याच्या ठिकाणी किंवा घरगुती वापरामध्ये केरसुणी व झाडू मारण्याची परंपरा आहे.
माहेरची लक्ष्मी म्हणून केरसुणीकडे पाहिले जाते
भारतीय संस्कृतीमध्ये विवाह ही एक धार्मिक सोहळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण अशी रीत आहे. यामध्ये वधूच्या घरच्यांकडून माहेरची लक्ष्मी म्हणून केरसुणी दिली जाते. यामुळे घरात सुख, शांती व समृद्धी निर्माण करण्यास मदत होते ही परंपरा शेकडो वर्षांपासून लग्न सोहळ्यामध्ये चालत आली आहे.
हेही वाचा - केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे जिल्हा बँकेवर वर्चस्व कायम; 11 जागांवर फुलले कमळ