सोलापूर - राजकारणात कधीही काहीही घडू शकतं, असं म्हणतात तेच खरं आहे. आपल्या वक्तृत्वासाठी महाराष्ट्रभर परिचित असलेले, लक्ष्मणराव ढोबळे यांनी सोमवारी सुधाकर परिचारिकांच्या प्रचार रॅलीत चक्क नाच करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
हेही वाचा... विधानसभा निवडणुकीत 9 हजार 673 केंद्रातील मतदानाचे होणार लाइव्ह वेबकास्ट
सुधाकर परिचारिकांच्या रॅलीत लक्ष्मणराव ढोबळेंनी धरला हलगीवर ठेका
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पुरस्कृत उमेदवार सुधाकर परिचारक यांची सोमवारी मंगळवेढ्यात प्रचार रॅली सुरु होती. यावेळी लक्ष्मणराव ढोबळे यांनी हातात भाजपचा झेंडा घेऊन नाच केला आहे.
हेही वाचा... 'नेते, मतदार अन् माध्यमांनी सभेत अनावधानाने बोललेले वाक्य अथवा कृतीला महत्व देऊ नये'
कोण आहेत लक्ष्मणराव ढोबळे ?
शरद पवार यांचे एकेकाळी निकटवर्तीय म्हणून ढोबळे यांची ओळख होती. शिक्षण संस्था, मंत्रिपद असा रुबाब असणारे ढोबळे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला अन त्यांची राजकीय कार्यकिर्दीला घरघर लागली. 2014 ला राष्ट्रवादीने त्यांना तिकीट नाकारले. तेव्हा ते अपक्ष लढले, नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मंगळवेढ्याचे 3 वेळा नेतृत्व करणारे आणि राज्याचे माजी मंत्री राहिलेल्या लक्ष्मणराव ढोबळे यांच्या या नाच करण्याची चर्चा सध्या मतदारसंघात रंगली आहे.