पंढरपूर - राज्यात सुखशांती नांदावी, देशासह राज्यावरील कोरोना संकट दूर व्हावे, राज्यामध्ये सर्वधर्मसमभाव एकत्रित नांदावे असे साकडे विठुरायाच्या चरणी घातल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली.
शासकीय महापूजा संपन्न -
विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा रात्री दोनच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक पार पडली. मानाचे वारकरी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील नीला सोनखेड येथील कोंडीबा देवराव टोणगे व प्रयागबाई कोंडीबा टोणगे यांना हा मान देण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, हॉटेल मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे, नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांच्यासह मंदिर समिती सदस्य उपस्थित होते.
विठूरायाच्या पदस्पर्श दर्शन लवकर -
राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी विकास आघाडी सरकारने निर्णय घेतला होता. याबाबत प्रशासकीय विभागातूनही सकारात्मक उत्तर देण्यात आले होते. त्यानुसारच राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना खुले करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कार्तिकी यात्रा निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. विठूरायाच्या पदस्पर्श दर्शन लवकर सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचा विचार केला. जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली आहे.
'कोरोना संदर्भात नागरिकांनी सतर्क राहावे'
पहिल्या दुसऱ्या लाटेमध्ये आपल्या सर्वांची जिवाभावाची माणसे आपल्यातून निघून गेली आहे. त्यामुळे कोरोना यासंदर्भात नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. युरोप खंडातील काही देशांमध्ये कोरोनाची परिस्थिती भयावह झाली आहे. राज्यातील येणार या परिस्थितीचा धोका ओळखून सतर्क राहण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. महा विकास आघाडी सरकार उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वाखाली सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेण्याचे काम करत आहे. मधल्या काळात महाराष्ट्र मध्ये जातीय तेढ निर्माण करून दंगली झाले आहे. राज्य सरकारने त्या दंगली आटोक्यात आणण्याचे काम केले आहे. समाज माध्यमातून जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्वांमध्ये राजकारण न करतात एकत्र येण्याची गरज असल्याची प्रतिपादन उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - कार्तिकी वारी : कार्तिकीचा सोहळा। चला जाऊं पाहूं डोळां। विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नयनरम्य आरास