ETV Bharat / state

नक्षवाद्यांशी लढताना पंढरपूरच्या धनाजी व्हनमानेंना वीरमरण, गावावर शोककळा - Naxal attack news

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक धनाजी तानाजी व्हनमाने यांना वीरमरण आले. ते मूळचे पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील असून, त्यांच्या विरमरणाचे वृत्त येताच पुळूज गावावर शोककळा पसरली.

Jawan of Pandharpur martyred in Gadchiroli Naxal attack
नक्षवाद्यांशी लढताना पंढरपूरच्या धनाजी व्हनमानेंना वीरमरण
author img

By

Published : May 17, 2020, 10:11 PM IST

Updated : May 17, 2020, 10:31 PM IST

सोलापूर - गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक धनाजी तानाजी व्हनमाने यांना वीरमरण आले. रविवारी सकाळी भामरागड तालुक्यातील पोरायकोटी कोपरशी जंगलात पोलिसांचे क्यूआरटी पथक आणि नक्षलवादी यांची चकमक झाली. यावेळी नक्षलवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात धनाजी व्हनमाने यांना वीरमरण आले. ते मूळचे पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील असून, त्यांच्या वीरमरणाचे वृत्त येताच पुळूज गावावर शोककळा पसरली.

नक्षवाद्यांशी लढताना पंढरपूरच्या धनाजी व्हनमानेंना वीरमरण, गावावर शोककळा

व्हनमाने यांना 8 दिवसापूर्वी पोलीस महासंचालकांकडून पदक मिळाले होते. राष्ट्रपती पदकासाठी देखील त्यांचे नाव घेण्यात आले होते. 2013मध्ये स्पर्धा परिक्षाद्वारे ते पोलीस सेवेत दाखल झाले होते. पुण्यातील मुंढवा येथे त्यांची पहिली पोस्टिंग होती. त्यानंतर गडचिरोली येथे त्यांची बदली झाली होती. नक्षलवाद्यांशी सामना करताना अनेक नक्षलवाद्यांना त्यांनी कंठस्नान घातले होत. 3 वर्षांचा इथला कार्यकाळ त्यांचा संपलेला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे बदली होऊ शकली नव्हती.

अतिशय गरिबीतून धनाजी व्हनमाने हे पुढे आले होते. त्यांना एक भाऊ असून तोही सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. तर आई वडील हे शेतीकडे लक्ष देतात. धनाजी व्हनमाने यांचे वर्षभरापूर्वी लग्न जमलेलं होतं. काही अवधी मिळताच लग्न समारंभ उरकला जाणार होता. मात्र, तत्पूर्वीच त्यांना वीरमरण आल्याने संपूर्ण पुळूज गाव शोकसागरात बुडाला. त्यांच्या जाण्यानं व्हनमाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसलळा आहे.

Last Updated : May 17, 2020, 10:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.