ETV Bharat / state

आषाढी एकादशी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमंत्रण

आषाढी एकादशी सोहळ्यातील महापूजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

author img

By

Published : Jun 3, 2021, 4:35 PM IST

Updated : Jun 3, 2021, 5:42 PM IST

pandharpur
pandharpur

पंढरपूर - आषाढी एकादशी सोहळ्यातील महापूजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. राज्य सरकारने पांडुरंगाच्या महापुजेला परवानगी घ्यावी. परंपरेनुसार आषाढी एकादशी सोहळ्यासाठी विठ्ठल मंदिर समिती 12 जुलै ते 24 जुलै पर्यंत विठ्ठल मंदिर खुले ठेवणार आहे. मात्र, राज्य सरकारने भाविकांना दर्शनाची परवानगी दिली तर त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

माहिती देताना विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर

हेही वाचा - अखेर गोवा बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द, असा जाहीर केला जाईल निकाल

20 जुलैला होणार्‍या आषाढी एकादशी सोहळ्याच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये आषाढी सोहळा दरम्यान होणाऱ्या विविध कार्यक्रमांबाबत सदस्यांसोबत चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी सोहळ्यासाठी आमंत्रित करणे, विविध देवस्थानातील संतांच्या पादुकांना देव भेटीची परवानगी घ्यावी, राज्यातील संस्थांकडून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला 18 नैवेद्य दाखवण्याची परवानगी घ्यावी, या प्रमुख विषयांवर मंदिर समितीने सदस्यांसोबत चर्चा केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विठ्ठलाच्या महापूजेसाठी आमंत्रित

परंपरेनुसार आषाढी वारी एकादशी सोहळ्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना महापूजेचा मान दिला जात असतो. त्याचप्रमाणे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आले आहे त्यासंदर्भातील आमंत्रणाची पत्रिकाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिर समितीकडून पाठवून देण्यात आली आहे..

राज्य शासनाच्या नियमानुसार आषाढी सोहळा पार पडणार

गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे आषाढी सोहळा हा प्रतिकात्मक स्वरूपात साजरा करण्यात आला होता. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आषाढी सोहळा कशा पद्धतीने पार पडणार आहे याकडे सर्व वारकरी संप्रदायाचे लक्ष आहे. मात्र, राज्य शासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे नियम ठरवून देतील त्या नियमानुसार आषाढी सोहळा पार पडणार आहे.

हेही वाचा - भारतातील कोरोना संक्रमणाचा वेग घसरतोय, 1 लाख 34 हजार 154 नव्या रुग्णांची नोंद

Last Updated : Jun 3, 2021, 5:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.