ETV Bharat / state

माळशिरसमध्ये दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; ओडिशा व आंध्रप्रदेशातून मुसक्या आवळल्या - solapur crime

माळशिरस पोलीस ठाण्याचा हद्दीत देशी दारू दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्यात आले होते. हा गुन्हा 14 मार्च 2018 रोजी दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी नुकतेच ओडिशा आणि आंध्रप्रदेशातून 5 संशयित आरोपींना अटक केली आहे.

solapur crime
बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
author img

By

Published : Nov 11, 2020, 5:27 PM IST

सोलापूर - माळशिरस पोलीस ठाण्याचा हद्दीत देशी दारू दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्यात आले होते. हा गुन्हा 14 मार्च 2018 रोजी दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी नुकतेच ओडिशा आणि आंध्रप्रदेशातून 5 संशयित आरोपींना अटक केली आहे. यातील दोघांना सांगलीतून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून एक देशी कट्टा, पिस्तुल व जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अधिकृत माहिती दिली.

माळशिरसमध्ये दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; ओडिशा व मध्यप्रदेशातून मुसक्या आवळल्या

सोलापूर-माळशिरस पोलीस ठण्याच्या हद्दीत बंदुकीचा धाक दाखवून 14 मार्च 2018 रोजी दरोडा टाकण्यात आला. या दरोड्याचा तपास करताना पोलिसांनी एका संशयितास सदाशिव नगर (माळशिरस) येथून ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली. यानंतर देशी दारूच्या दुकानाचा दरोडा उघडकीस आणला. या प्रकरणी गणेश उर्फ गोट्या हाकेअनिल उर्फ संदीप दिलीप लवटे, सम्राट उर्फ समाधान दिलीप खरात, प्रकाश श्रीरंग जाधव, सुधाकर अशोक मोहिते अशी अटक केलेल्यांची नावं आहेत.

14 मार्च 2018 रोजी या संशयित आरोपींनी माळशिरस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका देशी दारूच्या दुकान चालकाला बंदुकीचा धाक दाखवून 31 हजार रुपयांची रोख रक्कम, 2 मोबाइल असा ऐवज लंपास केला होता.

दोन वर्षांपासून पोलीस मागावर

या गुन्ह्याचा दोन वर्षांपासून तपास सुरू होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके हे या दरोड्याचा दोन वर्षांपासून तपास करत होते. यानंतर एका खबऱ्याने माहिती दिली की, देशी दारू दुकान लुटणारे चोरटे सदाशिव नगरात आहेत. त्यावरून एपीआय शेळके यांनी एका चोरट्यास ताबडतोब अटक करून चौकशी सुरू केली. या दरोड्यातील इतर संशयित आरोपी हे ओडिशा व आंध्रप्रदेशात पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दोन पथके तयार करून या राज्यांत पाठवली. यानंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

पाचजण गजाआड

यातील अन्य दोघे सांगलीत असल्याची माहिती मिळाली. माळशिरस पोलिसांनी विटा पोलिसांच्या मदतीने दोघांना सांगलीतून अटक केली. या दरोडा प्रकरणात एकूण 5 संशयित आरोपींना अटक झाली आहे. त्यांच्याकडून एक देशी कट्टा, एक पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई एपीआय शशिकांत शेळके,पोलीस नाईक सचिन हेमबाडे,समाधान शेंडगे,सोमनाथ माने,दत्तात्रय खरात,अनवर अत्तार यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.