ETV Bharat / state

काँग्रेस आमदाराच्या विविध प्रकल्पावर आयकर विभागाचा छापा; सोलापूरसह देशभरात कारवाई सुरू - income tax department raids ON MP congress mla

सोलापूर-पूणे महामार्गावर असलेल्या चिंचोळी एमआयडीसीमध्ये असलेल्या बेतुल ऑईल मिलमध्ये गुरुवारी 18 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाने छापा कारवाईस सुरुवात केली. सोमवार 22 फेब्रुवारीपर्यंत जवळपास 8 कोटींची रोकड आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. ही सर्व रक्कम रविवारीच स्टेट बँकेच्या ट्रेजरी शाखेत आयकर विभागाच्या शासनाच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

income tax department raids ON MP congress mla property
काँग्रेस आमदाराच्या विविध प्रकल्पावर आयकर विभागाचा छापा; सोलापूरसह देशभरात कारवाई सुरू
author img

By

Published : Feb 22, 2021, 7:03 PM IST

सोलापूर - शहराला चिटकून असलेल्या चिंचोळी एमआयडीसीमधील बेतुल ऑइल मिलवर 18 फेब्रुवारीपासून सोलापूर व भोपाळ आयकर विभागाची संयुक्त कारवाई सुरू आहे. या कारवाईमध्ये कोट्यवधी रुपयांची रोखड आयकर विभागाच्या हाती लागली आहे. मध्य प्रदेशमधील काँग्रेस आमदार निलय डागा यांच्या उद्योग समूहाने कोट्यवधी रुपयांचा कर बुडवून व्यवसाय करून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा संशय आयकर विभागाने व्यक्त केला आहे. सोलापूर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती देण्यास मनाई केली आहे. कारण त्यांचा अजूनही तपास सुरू आहे आणि बेतुल ऑइल मिलमध्ये कारवाई सुरू आहे. गुरुवार 18 फेब्रुवारीपासून आजतागायत 22 फेब्रुवारी सोमवारपर्यंत जवळपास 8 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. आमदार निलय डागा यांच्या देशभरातील विविध उद्योग समूहावर एकाच वेळी आयकर विभागाची ही कारवाई सुरू आहे.

अधिक माहिती देताना आमचे प्रतिनिधी
चिंचोळी एमआयडीसीमधील बेतुल ऑइल मिलमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त -
सोलापूर-पूणे महामार्गावर असलेल्या चिंचोळी एमआयडीसीमध्ये असलेल्या बेतुल ऑईल मिलमध्ये गुरुवारी 18 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाने छापा कारवाईस सुरुवात केली. सोमवार 22 फेब्रुवारीपर्यंत जवळपास 8 कोटींची रोकड आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. ही सर्व रक्कम रविवारीच स्टेट बँकेच्या ट्रेजरी शाखेत आयकर विभागाच्या शासनाच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
बेतुल ऑईल मिलमधून पळून जाणाऱ्या संशयित इसमास घेतले ताब्यात -
बेतुल ऑइल मिलमध्ये सोयाबीनचे गोडे तेल तयार केले जाते. हे गोडे तेल देशभरात विक्री केले जाते. कोट्यवधी रुपयांची उलाढाल या कंपनीमधून होते. पण ही उलाढाल अंगडाईया (हवाला) माध्यमातून होत असल्याचा संशय आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना आला. देशभरात बेतुल ऑइलचे विविध शाखा आहेत. भोपाळ येथून या कारवाईस सुरुवात झाली. याचे धागेदोरे सोलापूरपर्यंत पोहोचले आणि भोपाळ आयकर विभाग आणि सोलापूर आयकर विभाग यांची संयुक्त मोहीम सुरू झाली. सोलापूर येथील बेतुल ऑइल फॅक्टरीमध्ये आयकर विभागाचे अधिकारी ज्यावेळी पोहोचले. त्यावेळी बेतुल ऑईल मिलमधील एक संशयित इसम बॅगमध्ये रोकड घेऊन जाण्याच्या तयारीत होता. पण आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याकडील 8 कोटींची रक्कम जप्त केली.
काँग्रेस आमदार निलय डागा यांच्या देशातील विविध उद्योग आयकर विभागाचा समूहावर छापा -
मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदार निलंय डागा यांचे देशभरात विविध उद्योग समूह आहेत. या सर्व ठिकाणी एकाच वेळी कारवाई होत आहे. जवळपास 100 कोटींची रोकड जप्त होऊ शकते, असा अंदाज यावेळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.