ETV Bharat / state

कोयत्याने वार करून पतीकडून पत्नीची हत्या, बार्शी तालुक्यातील घटना - कोयत्याने वार करून पत्नीची हत्या

बार्शी तालुक्यात मुंगशी (आर) ते उपळे दुमाला येथे कोयत्याने वार करून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी २३ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत आरोपी पतीविरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Husband murder wife
Husband murder wife
author img

By

Published : Nov 24, 2021, 3:04 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - बार्शी तालुक्यात मुंगशी (आर) ते उपळे दुमाला येथे कोयत्याने वार करून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी २३ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत आरोपी पतीविरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येचे कारण असून अस्पष्ट आहे.

वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पती किरण तुकाराम घरबुडवे (रा. भातंबरे ता. बार्शी) हा आपल्या पत्नी सोनाली किरण घरबुडवे, मुलगी दिक्षा (वय ६) व मुलगा सिद्धार्थ (वय ३) यांच्यासह धामणगाव येथे आले होते. त्यानंतर दोन-तीन दिवस ते धामणगाव येथे थांबले.

मंगळवारी २३ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास धामणगाव येथून ते भातंबरेकडे जाण्यासाठी निघाले. दरम्यान मौजे मुंगशी (आर) ते उपळे दुमाला दरम्यानच्या रस्त्यात पती किरण घरबुडवे याने आपली पत्नी सोनाली हिच्या बरोबर भांडण केले व तिच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले. सदर घटनेनंतर पती किरण घरबुडवे हा फरार झाला आहे. या घटनेची फिर्याद सोनालीचा भाऊ अतुल दिलीप हेडंबे (रा. धामणगाव) यांनी वैराग पोलिसात दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनय बहिर करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.