ETV Bharat / state

सोलापूर : सांगोला तालुक्यात अनैतिक संबंधातून पत्नीने काढला पतीचा काटा

सांगोला तालुक्यातील हंगिरगे येथे सोपान भीमराव गावडे हा पत्नीचा मुलांबरोबर राहतो. सोपान याचा काही दिवसापूर्वी पहिल्या पत्नी सोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर मंगळवेढा तालुक्यातील पमाबाई हिच्यासोबत सहा वर्षांपूर्वी दुसरा विवाह करण्यात आला. मात्र, सोपान व रमाबाई यांच्यात वारंवार तक्रारी होऊ भांडणे होण्यास सुरुवात झाली होती.

sangola police station
सांगोला पोलीस ठाणे
author img

By

Published : May 21, 2021, 5:25 PM IST

Updated : May 24, 2021, 5:58 PM IST

सोलापूर - सांगोला तालुक्यातील गावडेवाडी येथे अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा वतीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती सोपान भिमराव गावडे (वय 39 रा. हांगीरगे ता. सांगोला) यांच्या खून प्रकरणात पत्नी पमाबाई सोपान गावडे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तालुका पोलीस ठाण्यात पुतण्या दत्तात्रय गावडे यांनी तक्रार दिली आहे.

पत्नीकडून पतीचा अनैतिक संबंधामुळे खून -

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगोला तालुक्यातील हांगीरगे येथे सोपान भीमराव गावडे हा पत्नीचा मुलांबरोबर राहतो. सोपान याचा काही दिवसापूर्वी पहिल्या पत्नी सोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर मंगळवेढा तालुक्यातील पमाबाई हिच्यासोबत सहा वर्षांपूर्वी दुसरा विवाह करण्यात आला. मात्र, सोपान व रमाबाई यांच्यात वारंवार तक्रारी होऊ भांडणे होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे पमाबाई ही सहा महिने माहेरी जाऊन राहत असे. सोपान हा पमाबाईच्या चारित्र्यावर संशय घेत होता. पमाबाईचे तिच्या गावातील एका दुकानदाराला सोबत संबंध असल्याची माहितीही सोपानाला होते. त्यात रमाबाई ही त्या दुकानदारासोबत सातत्याने बोलत असताना सोपान आढळत असे. यावरुन त्या दोघांमध्ये वाद होत होता. मात्र, पमाबाई त्याला जुमानत नव्हती.

हेही वाचा - येथे माणूसकी ओशाळली.. कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेऊन नातेवाईक पसार

पत्नीच्या अनैतिक संबंधाचा पती ठरला शिकार -

20 मे रोजी रात्री 3च्या सुमारास सोपान गावडे यांच्या घरातून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. त्याच वेळी शेजारी राहणाऱ्या मंगल मिटकरी व शोभा गावडे यांना लहान मुलांच्या रडण्याचा आवाज एकू येत होता. त्यानंतर त्यांनी सोपान याचा पुतण्या दत्तात्रय गावडे व त्याची पत्नी रोहिणी हिला उठवले. त्यानंतर दत्तात्रय व पत्नी रोहिणी हे दोघेजण लगेच पमाबाईच्या घरी गेले. त्यावेळी पमाबाई ही घराच्या अंगणात झोपली होती. दत्तात्रय याने पमाबाईला उठवून सोपान कुठे आहे? असे विचारले. ते बाहेर गेल्याचे तिने सांगितले. त्यानंतर दत्तात्रय गावडे यांनी जरा दम देऊन विचारले असता, त्यानंतर पमाबाईने सोपान हा घरात दारू पिऊन झोपला असल्याचे सांगितले. त्यानंतर शेजारील मंडळी घरात शिरल्यानंतर सोपान हा झोपलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर दत्तात्रय यांनी सोपान यांना हाक मारली असता कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांचा श्‍वास बंद झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी तातडीने सोपान यांचा मृत्यू झाल्याचे शेजारी व नातेवाईकांना फोन करून सांगितले.

पोलीस तपासात अनैतिक संबंधातून खून झाल्याचे निष्पन्न -

सोपान गावडे यांच्या घरी विभागीय पोलीस अधिकारी जयश्री पाटील, पोलीस निरीक्षक सुहास पाटील यांच्या पथकाने पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी दत्तात्रय गावडे यांच्याकडे चौकशी केली असता गावातील दुकानदारा सोबत सोपान यांच्या पत्नी पमाबाईचे अनैतिक संबंध असल्याचे आढळून आले. त्यामुळे सोपान व पमाबाई यांच्यात सातत्याने भांडण व वाईट वागणूक मिळत असल्याने सोपान यांचा खून केल्याचे पमाबाई कबूल केले. तिने पमाबाई हिने पती सोपान गावडे याचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले. खून केल्याचे कोणाला समजू नये, म्हणून तो घरात नसल्याचे सांगून पुरावा नाहीसा करण्याचा प्रयत्न केला, असेही सांगितले. त्यानुसार दत्तात्रय यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पमाबाई हिला ताब्यात घेतले.

हेही वाचा - पुण्यात तरुणींनी उतरवले अनेक तरुणांचे कपडे, वाचा...

Last Updated : May 24, 2021, 5:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.