ETV Bharat / state

श्री विठ्ठल रुक्मिणी समितीकडून शेकडो वर्षाच्या मूर्ती भाविकांना दर्शनासाठी खुल्या - पंढरपूर लेटेस्ट न्यूज

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पंढरपुरात रोज हजारो भाविक विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. या भक्तांकडून घरातील देव्हारामधील भंग पावलेल्या मुर्त्या मंदिर परिसरात ठेवून जाण्याची परंपरा आहे.

शेकडो वर्षाचा मुर्त्या भाविकांना दर्शनासाठी खुल्या

author img

By

Published : Jun 19, 2021, 10:48 AM IST

Updated : Jun 19, 2021, 12:04 PM IST

पंढरपूर (सोलापूर)- वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणार्‍या श्री विठूरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरी नगरीत येत असतात. त्या भाविकांना आता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दर्शनाबरोबर आता शेकडो वर्षांपूर्वीच्या व दुर्मिळ मुर्त्या पाहता येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी समितीकडून शेकडो वर्षाच्या मूर्ती भाविकांना दर्शनासाठी खुल्या

शेकडो वर्षाच्या भंग पावलेल्या मुर्त्या साठवण्याची परंपरा
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पंढरपुरात रोज हजारो भाविक विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. या भक्तांकडून घरातील देव्हारामधील भंग पावलेल्या मूर्ती मंदिर परिसरात ठेवून जाण्याची परंपरा आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून सर्व पुरातन व भंग पावलेल्या मूर्ती मंदिरातील एका खोलीत ठेवून त्याचे पूजन केले जात होते. ही परंपरा मंदिर समितीकडून अनेक वर्षापासून चालवली जात होती.

कार्यकारी अधिकारी जोशी यांच्या कल्पनेतून 32 कोटी देवतांमधील मूर्त्यांना उजळा
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी गेल्या दीड वर्षापासून अत्याधुनिक साधनांचा वापर करून मंदिर सुशोभित करण्याचे काम केले आहे. मंदिरातील ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या 32 कोटी देवता मंदिर पाडून सर्व पुरातन मूर्ती मंदिर समिती आल्या होत्या. यातील अतिशय पुरातन आणि दुर्मिळ मूर्ती भाविकांना पाहता याव्यात, यासाठी वेगळे दालन केले आहे. यात अनेक वर्षापूर्वीच्या कृष्ण, महादेव, गणेश, विष्णू, बालाजी, शाळीग्राम, यासह देवीच्या विविध रूपातील कोरीव पितळी व तांब्याच्या मूर्तींचा समावेश आहे.

पुरातन मुर्त्या ठेवण्यासाठी भव्य दालनाची उभारणी

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडपामध्ये त्या मुर्त्या ठेवण्यासाठी एक भव्य दालन उभा करण्यात आले आहे. त्या दालनांमध्ये त्या पुरातन मूर्ती भाविकांच्या नजरेस पाडाव्या व भाविकांना पुरातन मूर्तींचे दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वैभवामध्ये अजून एक पुरातन मूर्तीच्या रूपात भर पडली आहे. श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर दोन महिन्यापासून बंद असल्यामुळे, अशा कामांना प्राधान्य देण्यात येत आहे.

Last Updated : Jun 19, 2021, 12:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.