ETV Bharat / state

सोलापूर : रुग्णालयांनी फायर - ऑक्सिजन ऑडिट करावे - जिल्हाधिकारी

शासकीय, खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करत असताना ऑक्सिजन पुरवठा, साठवणूक आणि त्याचे वाहन सुरक्षित पद्धतीने करणे आणि रुग्णालयात आग लागू नये, यासाठी फायर ऑडिट करून घेण्याच्या सूचना शंभरकर यांनी आदेशात दिल्या आहेत.

Milind shambharkar
मिलिंद शंभरकर
author img

By

Published : Apr 24, 2021, 7:19 AM IST

सोलापूर - जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. या पार्श्वभूमीवर रूग्णांना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनबाबत आणि आगीच्या घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय, खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तत्काळ करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

रुग्णालयात आग लागू नये म्हणून फायर ऑडिटचे आदेश-

शासकीय, खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करत असताना ऑक्सिजन पुरवठा, साठवणूक आणि त्याचे वाहन सुरक्षित पद्धतीने करणे आणि रुग्णालयात आग लागू नये, यासाठी फायर ऑडिट करून घेण्याच्या सूचना शंभरकर यांनी आदेशात दिल्या आहेत.

फायर ऑडिटचे प्रमाणपत्रे शासनास सादर करा -

सोलापूर शहर आणि ग्रामीण कार्य क्षेत्रात असणाऱ्या शासकीय, खाजगी रूग्णालयांनी ऑक्सिजन साठवण यंत्रणा, पुरवठा यंत्रणा, ऑक्सिजन संबंधित इतर बाबी सुरक्षित आणि अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्याबाबत त्रयस्थ ऑडिट करून घ्यावे. दोन्ही यंत्रणा सुस्थितीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र शहरमध्ये मनपा आयुक्त यांच्याकडे तर ग्रामीणमध्ये उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करावे.

दोन्हीकडील प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सक आणि सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रुग्णालयांनी फायर ऑडिट करून त्यानुसार तत्काळ उपाययोजना करण्यात यावी, तहसीलदार आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश शंभरकर यांनी दिले आहेत.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.