ETV Bharat / state

हुतात्मा सुनील काळे यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देणार; अनिल देशमुख यांची ग्वाही

author img

By

Published : Jun 27, 2020, 4:46 PM IST

हुतात्मा जवान सुनील काळे यांच्या कुटुंबाची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट घेतली. काळे यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्याची ग्वाही गृहमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांकडून काळे कुटुंबाला देण्यात आली.

ministers visit to family of martyr sunil kale
हुतात्मा सुनील काळे यांच्या कुटुबियांची मंत्र्यांनी घेतली भेट

सोलापूर- पुलवामा येथे अतिरेक्यांशी लढताना वीरमरण आलेल्या सुनील काळे यांच्या कुटुंबीयांची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेतली आणि सांत्वन केले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणेही उपस्थित होते. हुतात्मा काळे यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शिक्षणानुसार शासकीय सेवेत घेण्याची ग्वाही तिन्ही मंत्र्यांनी राज्य शासनाच्यावतीने दिली आहे.

पानगाव (ता. बार्शी) येथे हुतात्मा सुनील काळे यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन अनिल देशमुख,राजेश टोपे, दत्तात्रय भरणे यांनी आज सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समवेत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, आमदार संजय शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम साठे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.

हुतात्मा सुनील काळे यांची भाची वर्षा काळे यांनी सुनील काळे यांच्या कुटुंबाबाबत माहिती दिली. काळे कुटुंबीय जिरायती शेतीवर अवलंबून आहे. शहिदांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी कोणी नाही. कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत घेण्याची मागणी वर्षा काळे यांनी केली. आम्हाला हुतात्मा काळे यांचा अभिमान आहे. राज्य शासन खंबीरपणे काळे यांच्या कुटुंबाच्या पाठिशी आहे. कुटुंबातील एका व्यक्तीच्या शैक्षणिक योग्यते प्रमाणे शासकीय नोकरी देण्याची ग्वाही अनिल देशमुख यांच्यांसह इतर मंत्र्यांनी दिली.

वीर जवान काळे यांचा आम्हाला अभिमान असून काळे कुटुंबाला लागेल ती मदत शासन करेल, असे सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. शासकीय मदतीबरोबर खास बाब म्हणून काळे कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत घेण्याचा प्रयत्न शासन करेल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी हुतात्मा जवान सुनील काळे यांच्या आई कुसुम काळे, पत्नी अर्चना, मुले श्री आणि आयुष, भाऊ नंदकुमार आणि किरण यांच्या सोबत मंत्री महोदयांनी चर्चा केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.