ETV Bharat / state

कर्नाटकातून आलेला ५१ लाखांचा गुटखा जप्त; मोहोळ पोलिसांची कारवाई - mohol

महाराष्ट्रात गुटखाबंदी असल्यामुळे कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर गुटखा येतो. एका ट्रकमधून अवैधरित्या येणारा ५१ लाख रुपयांचा गुटखा मंगळवारी मोहोळ पोलिसांनी जप्त केला.

जप्त केलेल्या मुद्देमाल आणि आरोपीसह पोलीस पथक
author img

By

Published : Jul 31, 2019, 7:06 AM IST

सोलापूर - महाराष्ट्रात गुटखाबंदी असल्यामुळे कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर गुटखा येतो. एका ट्रकमधून अवैधरित्या येणारा ५१ लाख रुपयांचा गुटखा मंगळवारी मोहोळ पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक (के ए २२ डी ०८८३) या वाहनाची तपासणी केली असता या ट्रकमध्ये पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळला. ट्रक चालक पप्पू पाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चालक पप्पू पाल हा उत्तर प्रदेशातील असून हा गुटखा कर्नाटकातून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणण्यात येत होता.

पकडण्यात आलेला गुटखा हा कर्नाटकातील झळकी येथून अहमदनगर येथे नेण्यात येत होता. पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनात वाहनात १४० पोते सुगंधित तंबाखू अंदाजे किंमत १४ लाख रुपये व २८० पोते हिरा पानमसाला अंदाजित किंमत ३६ लाख ९६ हजार रुपये एवढ्या किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात भा.दं.सं. कलम १८८, २७२, २७३ व ३२८ त्याचप्रमाणे अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे कलम ५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:mh_sol_04_police_action_guthkha_7201168
कर्नाटकातून आलेला 51 लाखाचा गूटखा जप्त
मोहोळ पोलिसांची कारवाई , कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर राज्यात गूटख्याची आवक
सोलापूर-
51 लाख रूपयांचा गूटखा घेऊन जाणाऱ्या ट्रक मोहोळ पोलिसांनी जप्त केला आहे. महाराष्ट्रात गूटखाबंदी झालेली असल्यामुळे राज्यात कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर गूटखा येतो. यातीलच गूटखा घेऊन जाणारी एक गाडी मोहोळ पोलिसांनी जप्त केली आहे.
Body:मंगळवारी सकाळी मोहोळ पोलिसांनी गूटखा घेऊन जाणारा ट्रक पकडला. पोलिसांना खबऱ्या कडून मिळालेल्या माहितीनूसार वाहन क्रमांक KA २२ D ०८८३ या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनात पानमसाला व सुगंधित तंबाखु चा साठा आढळला. ट्रकचा चालक पप्पू पाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाहन चालक हा उत्तर प्रदेशातील असून हा गूटखा कर्नाटकातून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणण्यात येत होता.
पकडण्यात आलेला गूटखा हा कर्नाटकातील झळकी येथून अहमदनगर येथे नेण्यात येत होता. पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनात वाहनात १४० पोते सुगंधित तंबाखू अंदाजे किंमत रु. १४ लाख रूपये व २८० पोते हिरा पानमसाला अंदाजित किंमत रु.३६ लाख ९६ हजार रूपये एवढ्या किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम १८८,२७२,२७३ व ३२८ त्याचप्रमाणे अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे कलम ५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहेे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.