ETV Bharat / state

92 Year Old Man Get PhD : वयाच्या 92 व्या वर्षी पीएचडी प्रदान, ध्येयवेड्या आजोबांचा थक्क करणारा प्रवास

शिक्षणाचा प्रवाहात असणारा माणूस हा ज्ञानाने परिपूर्ण होतो असे म्हटले जाते. शासनाकडून ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहोचवणाऱ्या सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील 92 व्या वर्षी आजोबांना पीएचडी प्रदान ( 92 Year Old Man Get PhD ) केली. लालासाहेब बाबर ( social workers Lalasaheb Babar ) यांनी 92 व्या वर्षी सामाजिक काऱ्याच्या सन्मानार्थ हि पदवी बहाल करण्यात आली. कॉमनवेल्थ व्होकेशनल विद्यापीठाची पी.एच.डी. प्रदान करण्यात आली. 92 वर्षाचे आजोबा हे अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या युवकांसाठी आयकॉन ठरत आहे.

92 Year Old Man Get PhD
वयाच्या 92 व्या वर्षी पीएचडी प्रदान,
author img

By

Published : Feb 18, 2022, 12:31 AM IST

Updated : Feb 18, 2022, 3:38 AM IST

पंढरपूर - शिक्षणाचा प्रवाहात असणारा माणूस हा ज्ञानाने परिपूर्ण होतो असे म्हटले जाते. शासनाकडून ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहोचवणाऱ्या सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील 92 व्या वर्षी आजोबांना पीएचडी प्रदान ( 92 Year Old Man Get PhD ) केली. लालासाहेब बाबर यांनी 92 व्या वर्षी सामाजिक कार्याच्या सन्मानार्थ ही पदवी बहाल करण्यात आली. कॉमनवेल्थ व्होकेशनल विद्यापीठाची पी.एच.डी. प्रदान करण्यात आली. 92 वर्षाचे आजोबा हे अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या युवकांसाठी आयकॉन ठरत आहे.

लालासाहेब बाबर यांची प्रतिक्रिया

आयुष्यभर गांधी विचारसरणीचा आधार -

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील सोनंद या लहानशा गावांमध्ये लालासाहेब बाबर हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांचे सर्व कुटुंबातील सदस्य उच्चशिक्षित आहे. लालासाहेब बाबर यांचा जन्म मध्यप्रदेश मधील ग्वालियर(ग्वाल्हेर) येथे 1 जानेवारी 1930 मध्ये झाला. त्यांचे वडील माधवराव बाबर हे ग्वालियर येथील सिंधिया(शिंदे) संस्थान मध्ये हत्तीखाना व घोडदळ विभागाचे सरसेनापती म्हणून कार्यरत होते. बालपण राजेशाही परिवारासोबत अनुभवता आले. त्यानंतरचे शिक्षण सोनंद येथील शाळेत झाले.त्यावेळी देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ मोठया प्रमाणात सुरू होती. लहानपणापासूनच लालासाहेब बाबर यांना शिक्षणाचे महत्त्व कळाले होते. त्यातून त्यांनी आयुष्यभर गांधी विचारसरणीचा आधार घेतला.

92 Year Old Man Get PhD
लालासाहेब बाबर हे पीएचडी पदवी प्रमाणपत्र घेऊन

सरपंच म्हणून काहीकाळ सांभाळला पदभार -

लालसाहेब बाबर यांनी समाजामध्ये घडणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरा याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लालासाहेब बाबर यांनी 1946 ते 47 मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा सुरू केली. मानेगाव या ठिकाणी शाळा सुरू करून त्यांनी अध्यापनाच्या महान कार्यास सुरवात केली. समाजसेवा करता यावी म्हणून नोकरीचा 1950 मध्ये राजीनामा देऊन स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले. राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. सोनंद गावचे सरपंच म्हणून पदभार हाती घेतला. त्यांनी ग्रामीण भागातील समस्यांकडे दूरदृष्टीने पाहिले.

92 Year Old Man Get PhD
लालासाहेब बाबर यांच्या सत्कार करण्यात आला

गावात विविध उपक्रम -

1952 मध्ये तंटामुक्ती गाव अभियान योजना सोनंद ग्रामपंचायतीमध्ये अंमलात आणली. गावातील अनेक न्यायालयीन प्रकरण किंवा पोलीस स्टेशनमधील प्रकरण गावांमध्ये मिटवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. गावांमध्ये कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करून गाव भयमुक्त करण्याचा प्रयत्न केला. गाव स्वच्छ करण्यासाठी गाडगेबाबांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार त्यांनी गावामध्ये केला आणि गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केला.

92 Year Old Man Get PhD
लालासाहेब बाबर

विकासाची गंगा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवली -

ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सहा ते चौदा वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देण्यासाठी आग्रही राहून पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व सर्व शिक्षित झालेल्या झालेल्या तरुणांना प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू करण्यात महत्वाची भूमिका बजावली सत्तरच्या दशकामध्ये लालासाहेब बाबर यांनी जिल्ह्याच्या अनेक समित्यांवर चोखपणे काम केले. राजकारणाबरोबरच सामाजिक कामाची बांधीलकी जपत त्यांनी विकासाची गंगा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचे काम केले.

92 Year Old Man Get PhD
पीएचडी प्रमाणपत्र

महामारीतही उत्तम आरोग्य -

एक-एक पिढी उभा करण्याचं महत्त्वाचं कार्य त्यांनी केले. सायकल हे संपूर्ण जीवनामध्ये त्यांच्या प्रवासाचे मुख्य साधन होते. आजही वयाच्या 92 व्या वर्षी ते सायकलवरून प्रवास करतात. कदाचीत त्यामुळेच आज कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळातही या वयामध्ये उत्तम निरोगी आरोग्य सांभाळून आहेत.

चालते-बोलते विद्यापीठ -

वयाच्या 92 व्या वर्षीही तरुणांना लाजवेल असा उत्साह लालासाहेब बाबरे यांच्यात दिसून येतो त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्याची दखल घेऊन कॉमनवेल्थ व्होकेशनल या आतंरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठाने डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले. लालासो बाबर हे स्वातंत्रपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील शंभर वर्षातील चालते-बोलते विद्यापीठ म्हणून ओळखले जातात. ग्रामीण भागातील शिक्षण ते पीएचडी पदवी मिळवण्यापर्यंत त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

हेही वाचा - Minister Kapil Patil displeasure in Program: भूमिपूजन सोहळ्यात मंत्री कपिल पाटलांची नाराजी, एकनाथ शिंदेंनी 'अशी' काढली समजूत

Last Updated : Feb 18, 2022, 3:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.