ETV Bharat / state

Governor's Solapur Visit : राज्यपालांना पोलिसांनी गनिमी काव्याने पोहोचविले विद्यापीठात; आंदोलकांनी रोखला रिकामा ताफा - राज्यपाल सोलापूर दौरा शिवप्रेमींची निदर्शने

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे स्वामीधाम येथून विद्यापीठकडे रवाना होताना नवी शक्कल लढविली. गनिमी कावा करत रिकामा ताफा सोलापूर विद्यापीठाकडे रवाना केला. ( Governor's Solapur Visit ) आंदोलकांनी सोलापूर-पुणे महामार्गवर या रिकाम्या ताफा रोखण्याचा प्रयत्न केला तसेच निषेधार्थ घोषणा दिल्या. ( governor solapur visit shivpremi protest )

governor bhagat singh koshyari on solapur visit, shivpremi protest
आंदोलकांनी रोखला रिकामा ताफा
author img

By

Published : Mar 4, 2022, 1:46 PM IST

Updated : Mar 4, 2022, 2:38 PM IST

सोलापूर - पोलिसांनी गनिमी कावा या युक्तीने आंदोलकांना चकमा दिला आहे. राज्यपालांच्या दौऱ्यात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे स्वामीधाम येथून विद्यापीठकडे रवाना होताना नवी शक्कल लढविली. गनिमी कावा करत रिकामा ताफा सोलापूर विद्यापीठाकडे रवाना केला. ( Governor's Solapur Visit ) आंदोलकांनी सोलापूर-पुणे महामार्गवर या रिकाम्या ताफा रोखण्याचा प्रयत्न केला तसेच निषेधार्थ घोषणा दिल्या. ( governor solapur visit shivpremi protest ) मात्र, त्यात राज्यपाल नसल्याने आंदोलकांची एकच धांदल उडाली होती.

आंदोलक प्रतिक्रिया

राज्यपालांना जुने सोलापूरकडे जाताना भगवे झेंडे दाखवून निषेध -

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सोलापुरात हेलिकॉप्टरने सकाळी दहाच्या सुमारास पोहोचले. स्वामी धाम (जुळे सोलापूर) येथे ते आपल्या ताफ्यासह रवाना होताना, आसरा चौक येथे जात असताना, शेकडो शिवप्रेमींनी रास्ता रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, दीड हजार पोलिसांच्या फौजफाट्याने या शिव भक्तांना रस्स्त्यावर येऊ दिले नाही. ताफा जात असताना आंदोलकांनी भगवे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी करत निषेधार्थ घोषणा दिल्या.

राज्यपाल हेलिकॉप्टरने विद्यापीठाकडे रवाना -

जुळे सोलापुरातील उद्घाटन समारंभ संपवून राज्यपाल हे सोलापूर विद्यापीठाकडे निघाले. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून छुप्या मार्गाने त्यांना हेलिकॉप्टरकडे घेऊन गेले आणि त्यामध्ये बसवून सोलापूर विद्यापीठाकडे पाठविले आणि रिकामा ताफा रस्त्यावरून सोलापूर विद्यापीठाच्या दिशेने निघाला. सर्वांच्या नजरा रिकाम्या ताफ्याकडे होते.

आंदोलक प्रतिक्रिया

हेही वाचा - Anil Deshmukh Case : अनिल देशमुख यांचा जवाब नोंदवण्यासाठी सीबीआय कारागृहात पोहोचली

मडकी वस्ती येथे रिकामा ताफा अडविला -

सोहम लोंढे या सामाजिक कार्यकर्त्याने व त्याच्या समर्थकांनी सोलापूर-पुणे महामार्गावर मडकी वस्ती येथे राज्यपाल यांचा रिकामा ताफा अडविला आणि निषेधार्थ घोषणाबाजी सुरू केली. मात्र, या ताफ्यात फक्त पोलिसच होते. यानंतर सोहम लोंढे याने रस्त्यावर येऊन घोषणा सुरू करताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याला फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

Last Updated : Mar 4, 2022, 2:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.