ETV Bharat / state

शिवसेनेने आपली भूमिका कायम ठेवत शेतकऱ्यांना न्याय द्यावा - पडळकर

भाजप सत्तेत असताना पीक विम्यासाठी शिवसेना अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होती. आता शिवसेनेचे सरकार आहे. शेतकऱ्यांनी पीकविमा भरून देखील त्यांना विमा मिळालेला नाही. आता शिवसेनेने शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी भाजपाचे आमदर गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

गोपीचंद पडळकर
गोपीचंद पडळकर
author img

By

Published : Apr 3, 2021, 8:50 PM IST

पंढरपूर - भाजप सत्तेत असताना पीक विम्यासाठी शिवसेना अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होती. आता शिवसेनेचे सरकार आहे. शेतकऱ्यांनी पीकविमा भरून देखील त्यांना विमा मिळालेला नाही. आता शिवसेनेने शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी भाजपाचे आमदर गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेऊन, त्यांनी द्राक्ष बागांची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते.

द्राक्ष बागायतदारांना नुकसान भरपाई द्यावी

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे राज्यामध्ये टाळेबंदी लागू होण्याची दाट शक्यता आहे. याचा फटका राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने द्राक्ष बागाची जबाबदारी घ्यावी, टाळेबंदीच्या भीतीने द्राक्षाचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे द्राक्ष बागांचा पंचनामा करून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केली.

शिवसेनेने आपली भूमिका कायम ठेवत शेतकऱ्यांना न्याय द्यावा

राज्य सरकारचे सर्वच आघाड्यावर अपयश

राज्यातील सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. राज्य सरकारने स्पर्धा परीक्षा असो, अथव दुसऱ्या कोणत्याही परीक्षा अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, त्यांचीही नियुक्ती अद्याप करण्यात आलेली नाही. महाविकास आघाडीमध्ये नुसता गोंधळ सुरू आहे. आजवरच्या सर्व सरकारमधील हे सर्वात अपयशी सरकार आहे, अशी जोरदार टीका यावेळी पडळकरांनी केली आहे.

हेही वाचा - 'लसीकरण केंद्रांवर जाण्यास अक्षम असणाऱ्या 75 वर्षांवरील व्यक्तींच्या घरी जाऊन लसीकरण करा'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.