ETV Bharat / state

खासगी दवाखान्याचे बिले तपासण्यासाठी आठ तालुक्यांमध्ये शासनाचा ऑडिटर नियुक्त

author img

By

Published : Jul 25, 2020, 7:37 AM IST

खासगी रुग्णालयांतून वेगवेगळ्या उपचारांची मोठ्या रक्कमेची बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी शासनाकडे येत होत्या. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बिले तपासण्यासाठी लेखापरीक्षक नियुक्त करावेत, अशा सूचना दिल्या.

Collector
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरक

सोलापूर : खाजगी दवाखान्यांतील उपचाराच्या बिलांचे लेखा परीक्षण करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यात लेखापरीक्षण अधिकारी म्हणजेच ऑडिटर नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. रविवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत घोषणा केली होती.

खासगी रुग्णालयांतून वेगवेगळ्या उपचारांची मोठ्या रक्कमेची बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी शासनाकडे येत होत्या. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बिले तपासण्यासाठी लेखापरीक्षक नियुक्त करावेत, अशा सूचना दिल्या होत्या.

जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, मंगळवेढा, सांगोला, माढा, करमाळा, पंढरपूर, माळशिरस आणि बार्शी या तालुक्यात अधिकारी नियुक्त करण्यात आले. उर्वरीत दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि मोहोळ या तालुक्यात अधिकारी नियुक्त करण्याची कार्यवाही सुरु आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सोलापूर जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गजन्य आजारामुळे जिल्ह्यातील खासगी दवाखान्यातील बेड शासनाने अधिग्रहित केले आहे.

कोविडच्या रुग्णांवर खासगी दवाखान्यात देखील उपचार सुरू झाले आहेत. मात्र, खासगी दवाखाने मोठ्या प्रमाणात बिल घेतात. मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबातील रुग्ण खासगी दवाखान्यात उपचारासाठी जाण्यास नकार देत आहेत. त्यामुळे सरकारी रुग्णालयावरील ताण वाढला होता. तसेच ही खासगी रुग्णालये भरमसाठ बिल आकारत असल्याची अनेक तक्रारी आरोग्यमंत्री यांना, व जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने रविवारी सोलापूर दौऱ्यावर असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खासगी रुग्णालयाच्या अव्वाच्या सव्वा आकारल्या जाणाऱ्या बिलांवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाचा ऑडिटर नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

सोलापूर शहरात देखील वाढत्या कोविड रूग्णांची संख्या लक्षात घेता शहरातील 22 खाजगी रूग्णालयात कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रूग्णांवर उपचारानंतर जास्तीचे बिल आकारण्यात आल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रूग्णालयाच्या बिलाची तपासणी करण्यासाठी महापालिकेकडून 14 ऑडिटरची नियूक्ती करण्यात आली आहे.

प्रशासनाकडून कोविड संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून, डी.सी.ए. आणि सी.सी.ए.सी. या रुग्णालयाचे बिल तपासणी करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आदेश दिले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.