ETV Bharat / state

'तो' लव जिहाद नव्हे, 'त्या' मुलीचा तर कोरोनामुळे मृत्यू

author img

By

Published : Nov 12, 2020, 7:12 PM IST

शहरातील सोशल मीडियावर लव जिहाद झाला असल्याची माहिती फिरत आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे. पंरतु पोलिसांनी याचा सखोल अभ्यास करत परिपत्रक काढून माहिती दिली आहे की, तो लव जिहाद नाही आणि सोशल मीडियावर खोटी अफवा पसरवून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नका, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

girl who ran away with rickshaw driver dies due to corona, hindu right wing alleged love jihad case
'तो' लव जिहाद नव्हे, 'त्या' मुलीचा तर कोरोनामुळे मृत्यू

सोलापूर - शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सज्ञान मुलीने स्वखुशीने एका सज्ञान मुलासोबत जाणे पसंत केले. त्या मुलीचा कोरोना आजारामुळे मृत्यू झाला. परंतु सोलापूर शहर व जिल्ह्यात सोशल मीडियावर लव जिहादच्या खोट्या अफवा पसरवून समाजात तेढ निर्माण केल्या जात आहे. याबाबत जोडभावी पेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 नोव्हेंबर 2020 रोजी एक मुलगी हरवली असल्याची फिर्याद तिच्या नातेवाईकांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली होती. तिचे वय 19 वर्ष होते. सदर मुलगी ही एका रिक्षावाल्यासोबत गेली असल्याची माहिती समोर आली होती. त्या रिक्षावाल्याचे नाव हैदर मोहंमद मोटगी (वय 22 वर्ष) असे आहे.

मुलगी ही 30 ऑक्टोबर 2020 रोजी घरातून कामावर जाते असे सांगून गेली. पंरतु ही मुलगी कामावर न जाता त्या रिक्षवाल्यासोबत 2 दिवस सोलापूरात फिरत होती. 3 नोव्हेंबर 2020 रोजी तिच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात हरवले असल्याची फिर्याद दाखल केली. हैदर व त्या मुलीने पुणे येथे जाण्याचा निर्णय घेतला. एका खासगी ट्रॅव्हल्स बसने दोघांनी पुणे गाठले आणि एक भाड्याची खोली घेऊन राहू लागले.

कोरोना आजाराने मृत्यू -
2 नोव्हेंबर 2020 रोजी त्या मुलीला त्रास जाणवू लागल्याने पुणे येथील स्थानिक दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्याचा कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आला. त्याला कोविड रुग्णालयात दाखल केले. या परिस्थितीला घाबरून मुलगा हैदर मोटगी याने तेथून पळ काढला आणि कुणालाही न सांगता किंवा त्या मुलीची जबाबदारी न घेता पुणे येथून निघून गेला. मुलीचा कोरोना आजाराने मृत्यू झाला. पण कोविड आजाराने मृत शरीर अधिक दिवस ठेवता येत नाही म्हणून पुणे येथील प्रशासकीय संस्थेने त्यावर अंतिम संस्कर केले.

नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली -
11 नोव्हेंबर रोजी ही माहिती मृत मुलीच्या घरच्यांना व इतर नातेवाईकांना माहिती झाली आणि त्यांनी 11 नोव्हेंबर रोजी दुपारी जोडभावी पेठ पोलीस ठाणे गाठत संपूर्ण माहिती सांगितली. पोलिसांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन फिर्याद घेण्याचे कामकाज सुरू केले आणि नातेवाईकांना पोलीस ठाण्यात बसण्याची विनंती केली.

लव जिहाद आहे, असे सांगत संघटना दाखल
नातेवाईकांनी बाहेर जाऊन येतो असे सांगून पोलीस ठाण्यातून निघून गेले. पोलिसांनी देखील सज्ञान मुलगी आहे म्हणून हा विषय गंभीरपणे घेतला नाही. काही वेळाने विविध संघटनांते कार्यकर्ते जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे पोहोचून हे लव जिहादचे प्रकरण आहे. सदर मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करू लागले आणि अवघ्या काही तासांनी सोलापुरात लव जिहाद झाले आहे असे मेसेज सोशल मीडियावर फिरू लागले. यामुळे संपूर्ण सोलापूर पोलीस यंत्रणा कामाला लागली. त्यांनी सर्वांना आवाहन करून संबंधित मुलाला ताब्यात घेण्यात येईल आणि सखोल तपास केला जाईल असे आश्वासन दिले.

पोलीस यंत्रणा सतर्क -
बुधवारी 11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी वाऱ्यासारखी ही माहिती सोलापूर शहरातील कानाकोपऱ्यात पोहोचली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हैदर मोटगी याला ताब्यात घेतले असून एका परिपत्रका द्वारे माहिती दिली की, संबंधित दोघे हे सज्ञान आहेत. एकमेकांच्या परिचयाचे आहेत. सोशल मीडियावरून खोटी माहिती पसरवू नका. समाजात तेढ निर्माण करू नका असे आवाहन केले आहे. अन्यथा गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.