ETV Bharat / state

बी-टेकची पात्रता परीक्षा उत्तीर्ण; शेतकरी बापाकडे फी भरायला पैसे नसल्याने सोलापुरात विद्यार्थिनीची आत्महत्या

मुलीचे प्रवेशशुल्क भरण्यासाठी वडिलांनी खूप प्रयत्न केले. मात्र, पीककर्ज असल्याने बँका कर्ज द्यायला तयार नाहीत. शेवटी पैसे उपलब्ध न झाल्याने विद्यार्थिनीने आत्महत्या केली.

मृत रुपाली रामकृष्ण पवार
author img

By

Published : Jul 25, 2019, 7:56 PM IST

सोलापूर - बी टेकच्या पात्रता परीक्षेत 89 मार्क मिळवूनही प्रवेशासाठी शेतकरी वडिलांकडे पैसे उपलब्ध न झाल्याने एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वाळूज देगाव येथे ही घटना घडली. रुपाली रामकृष्ण पवार (वय १७ वर्ष), असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

शेतकरी बापाकडे प्रवेशशुल्क भरायला पैसे नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

रुपालीने बी-टेकची पात्रता परीक्षा दिली. त्यामध्ये तिला चांगले गुण देखील मिळाले. त्यानुसार तिचा लव्हली प्रोफेशनल अॅकाडमी येथे बी-टेक साठी प्रवेश मिळाला होता. सुरुवातीला या संस्थेत १० हजार रुपये भरले होते. उर्वरीत १ लाख रुपये २० जुलैपर्यंत भरण्याची मुदत होती. त्यासाठी वडिलांनी खपू प्रयत्न केले. त्यांनी शेतीसुद्धा विकायला काढली. मात्र, शेताला देखील ग्राहक मिळाला नाही. त्यामुळे ते हतबल झाले होते. वडिलांची घालमेल अन् प्रवेशशुल्क भरण्याची मुदत संपल्याने रुपालीने हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची आत्महत्या; मराठवाड्यातील लोण पश्चिम महाराष्ट्रात -

उस्मानाबाद, बीड पाठोपाठ आता आत्महत्येचे लोण पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातही येऊन पोहोचले आहे. शैक्षणिक कर्जाबाबत सरकारचे धोरण बदलले आहे. तर बँका दुष्काळपीडित शेतकऱ्यांना पिककर्जाच्या थकीत कर्जामुळे कुठलीच मदत द्यायला तयार नाहीत. मग शेतकऱ्यांनी जगावे कसे? आणि त्यांच्या मुलांनी शिकावे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिकायला पैसे नसेल. बँका कर्ज देत नसेल तर शेतकऱ्यांच्या पोरांनी आत्महत्याच कराव्या का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सरकार आता तरी ठोस पावले उचलणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Intro:सोलापूर : बी टेकच्या पात्रता परीक्षेत 89 मार्क मिळवूनही प्रवेशासाठी शेतकरी वडिलांकडे प्रवेशासाठी आवश्यक असणारे एक लाख रुपये उपलब्ध न झाल्याने एका हुशार विद्यार्थिनींनं कीटकनाशक पिवून आत्महत्या केलीय.ही घटना सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील वाळूज देगांव येथे घडलीय.Body:रुपाली रामकृष्ण पवार असं या सतरा वर्षीय विद्यार्थिनीचं नांव असून पंजाब-जालंधर येथील लव्हली प्रोफेशनल ऍकॅडमीत तिला बी टेक साठी प्रवेश मिळाला होता.पण या संस्थेत दहा हजार भरले होते उर्वरित एक लाख रुपये 20 जुलैपर्यंत रुपालीला भरायची गरज होती.त्यासाठी वडिलांनी खूप प्रयत्न केले.शिवाय शेतीसुद्धा विकायला काढली मात्र तिलाही गिऱ्हाईक न मिळाल्याने ते हतबल झाले.वडिलांची घालमेल अन उर्वरित फी भरायची मुदत संपल्याने अगतिक रूपालीनं शिक्षणाच्या कोंडीमुळे आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचललं आहे.Conclusion:उस्मानाबाद, बीड पाठोपाठ आता हे लोण आता पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातही येऊन पोहचलंयआज शैक्षणिक कर्जाबाबत सरकारचं धोरण बदललंय,तर बँका दुष्काळपीडित शेतकऱ्यांना पिककर्जच्या थकीत कर्जामुळं कुठूलीच मदत करायला तयार नाहीत.त्यामुळं रुपलीनं निवडलेला मार्ग व्यवस्थेनं निर्माण केला असं म्हणायला जागा आहे.त्यामुळं सरकार आता तरी ठोस पावलं उचलणार का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.