ETV Bharat / state

सोलापुरात यंदाही गणपती मिरवणुकीला बंदी, वाचा प्रशासनाचे नियम - सोलापूर गणपती मिरवणूक

सोलापूर पालिकेने यंदाच्या वर्षी गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना महापालिकेची पूर्व परवानगी घ्यावी लागेल. गणपती आणताना व विसर्जन करताना कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नाही. सार्वजनिक मंडळाची गणेश मूर्ती चार फूट, तर घरगुती गणपती दोन फुटाचा असावा, असे पालिकेच्या परिपत्रकात म्हटले आहे.

Solapur
Solapur
author img

By

Published : Sep 4, 2021, 10:53 AM IST

सोलापूर : 'यंदाच्या वर्षी गणेशोत्सवासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केले आहेत. यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना महापालिकेची पूर्व परवानगी घ्यावी लागेल. तसेच सार्वजनिक मंडळाची गणेश मूर्ती चार फूट, तर घरगुती गणपती दोन फुटाचा असावा. गणपती आणताना व विसर्जन करताना कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नाही', असे परिपत्रक महानगरपालिका प्रशासनाने काढले आहे. सावित्रीबाई फुले सभागृह येथे महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी सर्व सोलापूरकरांना कोरोना नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.

सोलापुरात यंदाही गणपती मिरवणुकीला बंदी

आरोग्य उपक्रम राबवत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन

'सर्व गणेश भक्तांनी शाडूच्या मातीची मूर्ती स्थापन करावी. या मूर्तींचे घरीच विसर्जन करावे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करता आरोग्य विषयक उपक्रम सार्वजनिक मंडळाने राबवावे. यंदाचे गणेश विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करावे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरातच गणपती विसर्जन करावे', असे आवाहन पालिकेने केले आहे.

पालिके तर्फे विसर्जनाची सोय

'सोलापूर महानगरपालिके तर्फे वॉर्डनिहाय, प्रभागनिय गणपतीची मूर्ती संकलित करून विसर्जन करण्याची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही स्वतः जाऊन कुठल्याही ठिकाणी विसर्जन करू नये. सर्व गणेश भक्तांनी आपल्या घरातच गणपती विसर्जन करावे किंवा जवळच्या महापालिकेने नेमून दिलेल्या ठिकाणी गणपती मूर्ती आणून द्यावी. या ठिकाणाहून गणपतीची मूर्ती संकलित करून महानगरपालिकेच्या वतीने विसर्जन करण्यात येईल. गणेश विसर्जनासाठी सोलापूर शहरातील अनेक एन.जी.ओ व मध्यवर्ती गणपती मंडळ, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने गणपती विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना संसर्गजन्य प्रादुर्भाव होणार नाही व थांबण्यास मदत होईल', असे महापौर श्रीकांचना यन्नम यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -दिल्लीत आंदोलनाला बसलेले शेतकरी जास्त शहाणे आहेत का?, चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.