सोलापूर - सोलापुरात मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन झाले आहे. शहरातील मध्यवर्ती मंडळाच्या अंतर्गत असलेल्या मोठ्या मंडळांसोबतच शाळांनीदेखील गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. सोलापूर शहरातील आय एम एस या शाळेने ढोल ताशाच्या गजरात गणेशाची प्रतिष्ठापना केली.
हेही वाचा - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सिद्धीविनायक चरणी; भाजप नेत्यांसोबत गुप्त चर्चा
सोलापूर येथील इंडियन मोडेल स्कूल या शाळेने दरवर्षीप्रमाणे दहाव्या दिवशी मिरवणूक काढली. विजापूर रोडवरून सुरू झालेल्या या मिरवणुकीमध्ये ढोल ताशा आणि झांज पथकाने सहभागी होत गणरायाचे मोठ्या आनंदी व उत्साही वातावरणात स्वागत केले. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे शेकडो विद्यार्थी लेझीमच्या तालावर आकर्षक असे पावले खेळत लेझीमचे सादरीकरण करत होते. शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी आनंदी आणि उत्साही मिरवणुकीच्या माध्यमातून गणरायाची मिरवणूक काढली आणि शाळेमध्ये गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
या पथकातील विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. मागील सात वर्षांपासून शाळेच्या मिरवणुकीमध्ये पुणेरी ढोल सहभागी झाले आहे. नऊवारी साडी नेसलेल्या व फेटा बांधलेल्या पारंपारिक वेशातील विद्यार्थिनी आणि कुर्ता पायजामा व पुणेरी पगडी परिधान केलेले विद्यार्थी यांच्या पुणेरी ढोल पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. शाळेने संस्कृती जोपासताना पर्यावरणाची काळजी घेत यावर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा देखील घेतली होती.
हेही वाचा - LIVE बाप्पा मोरया ! राज्यभरात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; वाजत-गाजत बाप्पांचं आगमन