ETV Bharat / state

Ashadhi Ekadashi : अब्दुल पटेलांनी वाचवले आत्तापर्यंत 35 वारकऱ्यांचे प्राण, आषाढी एकादशी निमित्त विनामूल्य सेवा - Varakaras bathed in Chandrabhaga today

आषाढी एकादशी निमित्ताने अनेक वारकऱ्यांनी आज चंद्रभागेत स्नान केले. स्नान करीत असताना अनेक वारकरी पाण्याचा अंदान न आल्याने नदीत बुडण्याच्या घटना घडतात. मात्र, या वारकऱ्यांच्या मदतीसाठी अब्दुल पटेल यांची वजीर रेस्क्यू फोर्स विनामूल्य सेवा बजावते. या संस्थेने आत्तापर्यंत 35 जणांना पाण्यात बुडण्यापासून वाचवले आहे.

Ashadhi Ekadashi
Ashadhi Ekadashi
author img

By

Published : Jun 29, 2023, 8:02 PM IST

अब्दुल पटेल यांची प्रतिक्रिया

पंढरपूर : आषाढी कार्तिकी भक्त जन येती, चंद्रभागेमध्ये स्नान जे करती. या संतांच्या वचनानुसार आज आषाढी एकादशी निमित्ताने लाखो वारकऱ्यांनी पंढरपुरातील चंद्रभागेत स्नान केले. मात्र, या लाखो वारकऱ्यांचा जीवही तितकाच महत्वाचा आहे. यासाठी कोल्हापुरातील वजीर रेस्क्यू फोर्स नावाची संस्था दरवर्षी वारकऱ्यांच्या मदतीला धावून येत असते. नदीत एकादा वारकारी बुडत असल्यास त्याला वाचण्याचे काम वजीर रेस्क्यू फोर्स करते.

विनामूल्य वारकऱ्यांची सेवा : या संस्थेचे संस्थापक अब्दुल पटेल आहेत. वझीर रेस्क्यू फोर्स संस्था खासगी व्यक्तींना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देऊन समाजासाठी काम करण्यास प्रवृत्त करते. ज्यामुळे अनेकांचे जीव वाचतात. दरवर्षी आषाढी एकादशीला सर्व वझीर संस्थेचे कर्मचारी चंद्रभागा नदीत विनामूल्य आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देतात. गेल्या तीन वर्षापासून सलग सेवा या संस्थेची सुरू आहे. यात संस्थेने अनेकांचे प्राण वाचवले आहेत.

जीव वाचवण्याचे धडे : चंद्रभागेच्या नदीपात्रात दहा ते बारा किलोमीटरपर्यंत ही संस्थेचे बचावकार्य सुरू आहे. संस्थापक अब्दुल पटेल हे व्यवसायाने बोट चालवतात. त्यांनी कोणतेही आपत्कालीन प्रशिक्षण घेतलेले नाही. मात्र, त्यांनी आपत्तीच्या परिस्थितीत जीव कसा वाचवायचा याचे प्रशिक्षण देण्यासाठी एक सामाजिक संस्था स्थापन केली आहे. आज त्यांच्याकडे दहा बोटी आहेत. त्या बोटींमध्ये ते गस्त घालून सर्व नदीपात्रांवर सतत लक्ष ठेवून असतात.

35 जणांना वाचवण्यात यश : आतापर्यंत या संस्थेने 35 जणांना बुडण्यापासून वाचवले आहे. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या दोन बोटी, वजीर फाऊंडेशनच्या चार बोटी घटनास्थळी कार्यरत आहेत. पंढरपूरमध्ये जवळपास 35 ते 40 सहाय्यक कर्मचारीही या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. अब्दुल पटेल यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्रशिक्षित एनडीआरएफ जवान नाहीत. बोटिंगचे काम करणाऱ्या पटेल यांचे जीवन कोल्हापुरातील पुरानंतर बदलले. कोल्हापूरच्या पुरात अडकलेल्या आपल्या कुटुंबाला वाचवताना त्यांना इतर कुटुंबाला कोण वाचवणार असा प्रश्न पडला. यातुनच त्यांनी पुढे या संस्थेची स्थापना केली.

चंद्रभागेच्या किनाऱ्यावर वारकऱ्यांची गर्दी : कोल्हापूरचा पूर असो की, पंढरपूरचा पूर या दोन्ही ठिकाणी ही संस्था सेवा देते. तेव्हापासून त्यांना पंढरपुरात वारकरांच्या मदतीसाठी बोलवण्यात येते. कोणत्याही पुरस्कारासाठी आपल्याला पांडुरंगाची सेवा करायची, आलेल्या वारकऱ्यांचा जीव वाचवायचा हीच देवाची खरी सेवा असल्याची प्रतिक्रिया अब्दुल पटेल यांनी दिली आहे. दरम्यान आज आषाढी एकादशी असल्याने चंद्रभागेचा किनारा खरोखरच वैष्णवांनी भरलेला होता. नदीच्या दोन्ही बाजूला स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. चंद्रभागेचे दर्शन घेतल्यानंतर भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जातात.

हेही वाचा - Nandwal Ashadhi Ekadashi Yatra: प्रतिपंढरपूर नंदवाळ येथे विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी; पुईखडीत झाले उभे रिंगण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.