ETV Bharat / state

कोल्हापूर, सांगली स्वच्छतेसाठी सोलापुरातून ४ पथके रवाना - कोल्हापूर, सांगलीतील महापुर

कोल्हापूर, सांगलीतील महापुरामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराच्या संकटानंतर आता आरोग्याचे संकट या परिसरात निर्माण झाले आहे. त्यासाठी सोलापुरातून स्वच्छता दूत पाठवण्यात आले आहेत.

कोल्हापूर, सांगली स्वच्छतेसाठी सोलापुरातून ४ पथके रवाना
author img

By

Published : Aug 17, 2019, 3:18 PM IST

सोलापूर - सांगली-कोल्हापूर-सातारा जिल्ह्यात पुराच्या हाहाकारानंतर आता या भागात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अस्वच्छता, मेलेली जनावरे यामुळे अस्वच्छता पसरली आहे. त्यासाठी सरकारच्यावतीने आजूबाजूच्या जिल्ह्यातील स्वच्छता पथके सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात स्वच्छतेसाठी तैनात केली जात आहेत. त्याचप्रमाणे शनिवारी सोलापुरातून चार पथके सांगली आणि कोल्हापूरला पाठवण्यात आली आहेत.

कोल्हापूर, सांगली स्वच्छतेसाठी सोलापुरातून ४ पथके रवाना

पुरामध्ये सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराच्या संकटानंतर आता आरोग्याचे संकट या परिसरात निर्माण झाले आहे. सांगली प्रशासनाच्या मागणीनुसार सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने २ पाण्याचे टँकर, एक जेटिंग मशीन यापूर्वीच पाठविण्यात आले आहेत. जवळपास १०० सफाई कर्मचार्‍यांचे पथक, ४ आरोग्य निरीक्षक साहित्य घेऊन परिवहन बसेस सांगली पूरग्रस्त भागाचा स्वच्छतेच्या मदत कार्यासाठी शनिवारी रवाना झाले आहेत. त्याचबरोबर पूरग्रस्त लोकांसाठी जीवनावश्यक वस्तू, संसारोपयोगी साहित्य तसेच शालेय साहित्य पुरवण्याचे प्रयत्न असल्याचे सोलापूर महापालिकेच्या महापौर शोभा बनशेट्टी यांनी सांगितले. याप्रसंगी उपमहापौर शशिकला बत्तुल, गटनेता चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी, परिवहन समिती सदस्य विजय पुकाळे आदी उपस्थित होते.

Intro:सोलापूर : सांगली-कोल्हापूर-सातारा जिल्ह्यात पुराने हाहाकार माजविल्यानंतर या भागात आता आरोग्याचा प्रश्न
निर्माण झाला आहे.अस्वच्छता,मेलेली जनावरं आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय.त्यामुळे सरकारी पातळीवर स्वच्छतेचे प्रयत्न होताना चे चित्र पाहायला मिळत आहे आणि त्यासाठी सरकारच्यावतीने आजूबाजूच्या जिल्ह्यातील स्वच्छता पथकं सांगली कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात स्वच्छतेसाठी तैनात केली जात आहेत. त्याचनिमित्ताने आज सोलापुरातून चार पथके सांगली आणि कोल्हापूरला पाठविण्यात आली आहेत.Body:पुरामध्ये सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.पुराच्या संकटानंतर आता आरोग्याचा संकट या परिसरात उभे टाकलाय सांगली जिल्हा प्रशासनाने स्वतः सांगली यांच्या मागणीनुसार सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने यापूर्वी दोन पाण्याचे टँकर,एक जेटिंग मशीन यापूर्वीच पाठविण्यात आले आहेत.आज जवळपास शंभर सफाई कर्मचार्‍यांचे पथक,चार आरोग्य निरीक्षक साहित्य घेऊन परिवहन बसेस सांगली पूरग्रस्त भागाचा स्वच्छतेच्या मदत कार्यासाठी रवाना झाले आहेत. महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या चार बसेसमधून हे पथक आज सांगलीकडे रवाना झाले.त्याचबरोबर पूरग्रस्त लोकांसाठी जीवनावश्यक वस्तू, संसारोपयोगी साहित्य तसेच शालेय साहित्य पुरवण्याचे आमचे प्रयत्न आहेत असे सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर शोभा बनशेट्टी यांनी सांगितले.
Conclusion:याप्रसंगी उपमहापौर शशिकला बत्तुल, गटनेता चेतन नरोटे,आनंद चंदनशिवे,नगरसेवक गणेश पुजारी,परिवहन समिती सदस्य विजय पुकाळे,सोलापूर सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ऐड.बसवराज सलगर,अरुणकुमार दुबे,उपायुक्त मुख्य लेखापरीक्षक अजयसिंह पवार, मुख्य सफाई अधीक्षक संजय जोगदंड,घनकचरा विभागाचे पवार आदी उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.