ETV Bharat / state

माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे अजूनही भाजप उमेदवाराच्या प्रतीक्षेत - लोकसभा निवडणूक

राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि माजी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे भाजपच्या तिकिटावर सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत.

लक्ष्मणराव ढोबळे
author img

By

Published : Mar 21, 2019, 9:07 PM IST

सोलापूर - राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि माजी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे भाजपच्या तिकिटावर सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठीची मागणीही त्यांनी पक्षाकडे केली असल्याची चर्चा सद्या राजकीय वर्तुळात आहे. आज भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. मात्र, त्यात त्यांचे नाव नसल्याने ते आणखीही उमेदवाराच्या प्रतीक्षेत आहेत.

लक्ष्मणराव ढोबळे

लक्ष्मणराव ढोबळे यांनी काही दिवसांआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश घेतला. ढोबळे यांनी लोकसभा उमेदवारी मिळावी म्हणूच भाजपमध्ये प्रवेश घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे ते सतत भाजपच्या निर्णयाची स्तुती करत आहेत. दोन दिवसांआधी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपत प्रवेश केला. त्यावर त्यांनी तोंड भरून मोहिते-पाटलांचे कौतुक केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशाचे खरे तारणहार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अन्याय करणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी विजयसिंह मोहिते पाटलांना जिल्ह्यातला १२ लाख हेक्टर सिंचनाचा प्रश्न सोडवू दिला नाही. भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा कधीही चांगली असल्याचा निर्वाळा, त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, ढोबळे हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातून त्यांची निर्दोष सुटका झाली आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला. पण या प्रकरणामुळे राष्ट्रवादीने त्यांना तिकीट नाकारले होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून ढोबळे हे मुख्यमंत्र्यांच्या व भाजपच्या संपर्कात होते.

Intro:माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे अजूनही भाजप उमेदवाराच्या प्रतीक्षेत

Body:भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पाया पडल्या नंतर वादात अडकलेले माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे भाजप वाशी झाले आहेत लक्ष्मणराव ढोबळे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रभावी नेते होते.पुढील काळात त्यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळही पडली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ढोबळे भाजपच्या तिकिटावर सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते. त्यासाठी प्रत्येक व्यासपीठावरून भाजप नेत्यांची स्तुती करण्यात ते अग्रेसर आहेत रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा त्यांनी तोंड भरून कौतुक केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशाचे खरे तारणहार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अन्याय करणारा पक्ष आहे विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रयत्न करू नये सोलापूर जिल्ह्यात 12 लाख हेक्टर सिंचनाचा प्रश्न सोडवु दिला नाही. भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा कधीही चांगली असल्याचा निर्वाळा लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिला आहे

Conclusion:MH_ProfLaxmanDhobalePraiseBjp_for SolapurLoksabha21.3.19
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.